नागपूर - विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शेजारी मंत्री गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर.
नागपूर - विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शेजारी मंत्री गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर. 
विदर्भ

विदर्भाचा चौफेर विकास, ५० वर्षांचा निधी पाच वर्षांत

सकाळवृत्तसेवा

नागपूर - संयुक्त महाराष्ट्रात सातत्याने अन्याय आणि उपेक्षा होत असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने जोर धरला. राज्याचा समतोल विकास आमचीही मागणी होती. भाजपच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात विदर्भाच्या चौफेर विकासाला सुरुवात झाली असल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ५० वर्षांचा निधी पाच वर्षांतच दिल्याचा दावा केला. 

फुटाळा तलाव परिसरात आयोजित कार्यक्रमात डझनभर विकासकामांचे ई-भूमिपूजन केंद्रीय मंत्री गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, महापौर नंदा जिचकार, जि. प. अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल, महापालिका आयुक्त संजय बांगर, नासुप्र सभापती शीतल उगले आदी उपस्थित होते.  

गडकरी म्हणाले, नागपूर शहराचा विकास होत आहे. ७० हजार कोटींच्यावर कामे नागपूर शहरात झाली आहेत. फुटाळा तलाव येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा म्युझिकल फाउंटेन तयार करण्यात येत आहे. याला पाहण्यासाठी देशातील नव्हे विदेशातील लोक पाहण्यासाठी येतील. अजनी रेल्वे स्टेशनचा परिसर अधिक भव्य करण्यात येत आहे. वर्धा रोडवरील जेल हे कोराडी येथे बांधण्यात येणार असून यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण १२०० कोटी रुपये देणार आहे. शिक्षण, आरोग्याची सुविधा उत्तम व दर्जेदार करण्यात आली आहे. मिहानच्या माध्यमातून ५० हजार युवकांना रोजगार देण्यात आला. फुटाळा तलावाच्या जवळच ॲग्रो कन्व्हेंशनल सेंटर तयार करण्यात येईल. शहराच्या चौफेर विकासाचे श्रेय हे जनतेचे आहे. त्यांनी सेवा करण्याची संधी दिली. विकासकाम हे फक्त न्यूज रील आहे, पिच्चर अभी बाकी हैं, असेही ते म्हणाले.

शहराचा चेहरामोहरा बदलला - मुख्यमंत्री 
नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. विदर्भाचा विकास केल्याशिवाय शांत बसणार नाही. गेल्या ५० वर्षांत जेवढा निधी मिळाला नाही, तेवढा निधी पाच वर्षांत मिळाला. २०३४ पर्यंत जगातील सर्वाधिक विकसित शहरांच्या यादीत पहिल्या दहांमध्ये नागपूरचा समावेश राहणार आहे, असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने म्हटले आहे. नागपूर, विदर्भही पर्यटनाची राजधानी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

विदर्भवाद्यांच्या घोषणा
गडकरी यांचे भाषण सुरू होताच लोकांमध्ये बसलेल्या विदर्भवादी कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरू केल्या. ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’, ‘वेगळ्या विदर्भाचे काय’ अशा घोषणा देत कागदपत्रे भिरकावली. गडकरी यांनी त्यांना शांत होण्याचा सल्ला दिला. मात्र आक्रमक कार्यकर्ते ऐकण्यास तयार नव्हते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT