vijay wadettiwar says The inauguration of the building will have to be investigated
vijay wadettiwar says The inauguration of the building will have to be investigated 
विदर्भ

विजय वडेट्टीवारांचे उत्तर, प्रस्ताव मंजूर करणे सोडा, इमारतीच्या उद्धाटनाचीच चौकशी करावं लागेल

सकाळ डिजिटल टीम

भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी ८ मे २०२० रोजी एक कोटी ५२ लाख ४४ हजार ७८३ रुपयांचे अंदाजपत्रक तयार झाले. तो प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला होता. प्रस्ताव मंजूर केला असता तर आजची घटना घडली नसती. त्यामुळे त्या प्रस्तावाची चौकशी केली गेली पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यावर २०१६ मध्ये याच इमारतीच्या उद्धाटनाचीही चौकशी करावी लागेल, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. 

वडेट्टीवार म्हणाले, २०१६ मध्ये या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा नव्हती. तरीही उद्घाटन का करण्यात आले, याची चौकशी आता करावी लागेल. कुणाच्या घाईमुळे उद्घाटन करण्यात आले, याचाही तपास होईल. बरेचदा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत काम केले जाते. पण आता या गोष्टींवर आता कुणीही राजकारण करू नये.

तर यापुढे रुग्णालय असो किंवा शाळा, इमारत अद्ययावत झाल्याशिवाय उद्घाटनच करू नये, असा नियम यापुढे करावा लागणार आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. दर तीन वर्षांनी रुग्णालयांच्या इमारतीचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झाले पाहिजे.

सर्वप्रथम दोषींना शोधावे लागेल. त्यानंतर कारवाईची दिशा निश्‍चित होईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत कारवाई केली जाईल. घाईगडबडीत इमारतीचं उद्घाटन झाल्यामुळे आजची घटना घडली. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण तपासणी झाल्याशिवाय कोणत्याही इमारतीचे उद्घाटन होणार नाही आणि ती इमारत वापरण्यात येणार नाही, याची दक्षता राज्य सरकार घेईल, असेही मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

तो प्रस्ताव २०१६ मध्येच का दिला नाही

अग्निशमन यंत्रणा उभारण्याचा गेल्या वर्षी पाठवलेला प्रस्ताव २०१६ मध्येच का पाठवण्यात आला नव्हता, जेव्हा इमारतीचे उद्घाटन करण्यात आले, असा सवाल मंत्री वडेट्टीवार यांनी विचारला आहे. गेल्या वर्षीचा प्रस्ताव कोरोनाच्या स्थितीमुळे राहिला असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT