violation of MSEB office and beating of power employees will lead to crime 
विदर्भ

नागरिकांनो! महावितरण कार्यालयात तोडफोड अन् वीज कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास गुन्हे होणार दाखल

संतोष ताकपिरे

अमरावती : कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही वीजग्राहकांच्या सेवेतील महावितरणचे अभियंते, कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु, यापुढे वीज कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा कार्यालर्यांमध्ये तोडफोड झाल्यास फौजदारी कारवाई होणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात आर्थिक संकटामुळे नाइलाजाने महावितरणकडून थकीत वीजबिलांची वसुली व थकबाकीदारांची वीज खंडित करण्याची कारवाई जोरात सुरू आहे. यादरम्यान त्यांना काही ग्राहकांकडून शिवीगाळ, धक्काबुक्की किंवा मारहाणीचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी नागरिकांकडून रोष व्यक्त करताना कार्यालयाची  तोडफोड करून नुकसानसुद्धा केले जाते. भविष्यात असे प्रकार घडल्यास तत्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांना वरिष्ठांनी दिल्या. वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांना प्रतिकुल परिस्थितीत रात्रंदिवस सेवा देणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांना तर दुसरीकडे वीजबिल वसुलीसाठी मारहाणीच्या प्रकारांना सामोरे जावे लागू नये, यासाठी काही कठोर निर्णय घेण्यात आले. शासकीय कामात अडथळा, अपशब्द वापरणे, धमकी, मारहाण, कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करून तोडफोड, सरकारी मालमत्तेचे नुकसान, अनधिकृत जमाव गोळा करणे आदी प्रकाराविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या कारवाईची तरतूद आहे. या विविध कलमान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये दहा वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. 

एक फेब्रुवारीपासून वीजबिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात अमरावती शहर विभागात चार, ग्रामीणमध्ये सात, अचलपूर एक तर मोर्शी विभागात तीन ठिकाणी महावितरण कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांकडून मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.   

देयक भरण्यासाठी पर्याय -
सद्यःस्थितीत महावितरणची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. थकबाकीचा भरणा करण्यासाठी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना देयक भरण्यासाठी हप्त्यांची सोय उपलब्ध करून दिली आहे. 

लाखो ग्राहकांकडे थकीत -
परिमंडालातील 1 लाख 89 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांनी एप्रिलनंतर एकदाही वीजबिल न भरल्याने नाइलाजाने गेल्या एक फेब्रुवारीपासून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले ! मशि‍दीजवळ स्फोटात १५ ठार, ५० हून अधिक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

३ महिलांनी बनवली फिल्म, ६०-६० लाखांच्या बजेटपासून तब्बल ३०० कोटींची कमाई; अवघ्या ४१ दिवसांत 'या' सिनेमाने रचला मोठा विक्रम

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Garlic for High Cholesterol : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होते का? NCBI संशोधनातून काय समोर आले?

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT