The voice of the teacher will remain silent on the table of the Legislative Council 
विदर्भ

विधान परिषदेच्या पटलावर शिक्षक, पदवीधरांचा आवाज राहणार मौन; कार्यकाळ संपला, अधिवेशनापूर्वी निवडणुकीची शक्यता नाही

नीलेश डोये

नागपूर : यंदाच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे कायदेमंडळ असलेल्या विधान परिषदेच्या पटलावर पदवीधर आणि शिक्षकांचा आवाज फारसा गुंजनार नाही. या सभागृहातील एकूण चार सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. यापैकी दोन विदर्भातील आमदार आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी निवडणूक होण्याची शक्यता नाही.

पदवीधर, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या माध्यमातून विधान परिषदेत प्रतिनिधी येतात. साधारणतः या क्षेत्राशी संबंधित प्रश्न, समस्या या प्रतिनिधी मांडाव्या, हा त्या मागचा उद्देश आहे. परंतु, यंदा हिवाळी अधिवेशनात नागपूर विभागातील पदवीधर तर अमरावती विभागातील शिक्षकांचे प्रतिनिधी नसेल. त्यामुळे त्यांच्या समस्याही प्रभावीपणे ऐकू येणार नाही.

सात डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. नागपूर विभागातून पदवीधर मतदार संघातून अनिल सोले तर अमरावती विभागातून शिक्षक मतदार संघातून श्रीकांत देशपांडे सदस्य होते. त्याचप्रमाणे दत्तात्रय सावंत हे पुणे विभागातील शिक्षक मतदार तर सतीश चव्हाण औरंगाबादमधील पदवीधर मतदार संघातील विधान परिषद सदस्य होते.

त्यांचा कार्यकाळ १९ जुलै २०२० ला संपला. त्यांच्या जागांसाठी निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोनामुळे केंद्रीय आयोगाने निवडणूक घेतली नाही. कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना विधान परिषदेत बसता येणार नाही.

अंतिम यादीसाठी लागणार वेळ

पदवीधर मतदारांची अद्याप यादीच अंतिम झाली नाही. ही यादी अंतिम झाल्यानंतर काही दिवसांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. याला बराच काळ लागेल. त्यामुळे अधिवेशनापूर्वी निवडणूक होणे शक्य नसल्याचे समजते.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT