voting percentage increases in amravati teacher constituency election
voting percentage increases in amravati teacher constituency election 
विदर्भ

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मतदानाचा टक्का वाढला, कोण ठरणार शिक्षकांच्या पसंतीचा उमेदवार?

सुधीर भारती

अमरावती : गर्दीने फुललेली मतदानकेंद्रे, जागोजागी लावण्यात आलेले बूथ, रांगांमध्येही मतदानाचा उत्साह मंगळवारी मतदानाच्या दिवशी सर्वत्र दिसून आला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे मतदान मंगळवारी (ता.1) शांततेत पार पडले. या निवडणुकीत 86.73 टक्के मतदान झाले असून 27 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत सीलबंद झाले. आता गुरुवारी (ता.3) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळी 8 वाजल्यापासून विविध मतदानकेंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी 8 ते 10 या वेळेत 10.11 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. दुपारी 12 पर्यंत 25.11 टक्के तर दोन वाजेपर्यंत 46.20 टक्के मतदान झाले होते. शहरातील शासकीय गर्ल्स हायस्कूल तसेच उर्दू हायस्कूल या मतदान केंद्रांवर मतदारांची चांगलीच गर्दी दिसून आली. गर्ल्स हायस्कूलमध्ये तर दुपारी लांब रांगा लागलेल्या आढळून आल्या. गर्ल्स हायस्कूल चौकात विविध उमेदवारांच्या समर्थकांनी मतदारांच्या सुविधेसाठी मतदार यादी बूथ सुद्धा तयार केले होते. या निवडणुकीत 27 उमेदवार भाग्य आजमावित असून प्रत्येकानेच आपल्या विजयाचा दावा केला आहे. मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी काही उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून यंत्रणा लावली होती. उमेदवारांचे समर्थक मतदान केंद्राच्या परिसरात दिसून येत होते. विशेष म्हणजे सकाळपासूनच मतदारांमध्ये जोश अन्‌ उत्साह दिसून येत होता.  

उमेदवारांची धावपळ -
या निवडणुकीत मतदारसंघाची व्याप्ती फार मोठी असल्याने उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली होती. अनेक उमेदवारांनी ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर जावून पाहणी केली, तर अनेकांनी शहरी केंद्रांवर 'पाळत' ठेवली. असे करीत असताना उमेदवारांची व त्यांच्या समर्थकांची चांगलीच दमछाक पाहायला मिळाली. मतदान संपल्यानंतर मतदानाच्या झालेल्या टक्केवारीवरून उमेदवारांच्या समर्थकांनी विजयाचे गणित सुद्धा मांडण्यास सुरुवात केली होती. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर तयारी -
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता. मतदारांचे थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर, मास्क अशी सर्व व्यवस्था मतदान केंद्रांवर होती. आरोग्य पथक सुद्धा तैनात होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT