10 kutumb.jpg
10 kutumb.jpg 
विदर्भ

भटक्या मजुरांचे झाले खाण्याचे वांदे; दहा कुटुंब आहेत वास्तव्यास

श्रीकृष्ण फंदाट

तेल्हारा (जि. अकोला) : शहरांमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या दहा कुटुंबांची मजुरी लॉकडाउनमुळे ठप्प झाल्याने त्यांच्या खायाचे वांदे होत आहेत. शहरातील काही स्वयंसेवी संस्थांकडून त्यांना जेवण पुरवण्यात येत आहे. पण ते अपुरे असल्याने त्यांच्यावर उपासमारेची वेळ आली आहे. शासनाकडून अद्याप कोणतीच मदत मिळत नासल्याचे कुटुंबातील सदस्यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

मिळालेल्या अन्नापासून लहान मुलांचेही पोट भरत नाही
पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यातील अनेक लोक वेगवेगळ्या लहान मोठ्या गावांमध्ये जाऊन काम करून आपल्या कुटुंबाची उदरभरण करतात. असेच आंबोळी टूनकी अमरावती येथून भाट गॅस दुरुस्ती व कटलरीचा व्यवसाय करण्यासाठी सुमारे दहा कुटुंब तेल्हारा शहरात अनेक दिवसांपासून दाखल झाले आहेत. त्यातील काही कुटुंब एका विशिष्ट जातीचे भाट आहेत. त्या जातीच्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन नवीन जन्मलेल्या किंवा नवीन सुनेचे नाव नोंदवून देतात. कुटुंबातील लोक आनंदाने त्यांना बिदागी देऊन त्यांचे स्वागत करतात. त्यावर या कुटुंबाची गुजराण होते. तर काही कुटुंबातील स्त्रिया व पुरुष मोठ्या शहरातील कटलरी सामान आणून गल्लोगल्ली जाऊन मिळेल त्या भावात विकून कुटुंब चालवतात. काही कुटुंब गॅस दुरुस्तीचे काम करतात. पण राज्यात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन झाल्यापासून त्यांची कामे ठप्प झाली आहेत. त्यांचे मुळगावी जाणे देखील शक्य झाले नाही. कामधंदे नसल्याने मजुरी मिळत नाही. परिणामी उपासमारीची वेळ आली पण काही समाजसेवी संस्था त्यांना जेवण पुरवत आहेत. परंतु, मिळालेने अन्न लहान मुलांचेच पोट भरत नाही. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांवर उपासमारेची वेळ आली असल्याची खंत त्यांनी ‘सकाळ’ सोबत बोलताना व्यक्त केली. तालुक्यतील प्रशासनाने दोन वेळचे जेवनापूरते गहू, तांदूळ, डाळी, तेल- मीठ पुरवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमच्या मुळगावी सोडून देऊ नका
आम्ही याठिकाणी दहा कुटुंब राहतो. यामध्ये लहान-मोठे पकडून जवळपास 40 लोक आहेत. कोरोनामुळे आम्हची सर्व कामधंदे बंद झाली. त्यामुळे उपासमारीची वेळ आली. काही लोक एक वेळचे जेवण देतात पण त्यावर भागत नाही. शासनाने आम्हास मदत करायला पाहिजे. पण आमच्या मुळगावी सोडून देऊ नये. कारण तिथेही आम्हच्यावर उपासमारेचीच वेळ आहे.
-कैलास सुरतकर, वास्तव्यास असलेला नागरिक.

नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे
बाहेरगावावरून आलेल्या मजुरांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांना नियमित धान्यपुरवठा झाला पाहिजे यासाठी नियोजन सुरू आहे. त्यांना शक्य तेवढ्या लवकर धान्यपुरवठा करण्याचे प्रयत्न करू. यासाठी गावातील नागरिकांनी देखील पुढाकार घ्यायला पाहिजे.
-राजेश सुरडकर, तहसीलदार, तेल्हारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT