wardha police arrested criminal vidarbha marathi news
wardha police arrested criminal vidarbha marathi news  
विदर्भ

संशयित व्यक्ती गाडी घेऊन बसस्थानक परिसरात होता फिरत; पोलिसांना कळताच धक्कदायक सत्य आलं समोर

रुपेश खैरी

वर्धा : सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गस्त सुरू असताना एक व्यक्‍ती मोपोड गाडी घेऊन संशयित रीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याचे नाव अमोल सगने असे असल्याचे सांगितले. 

येथील बसस्थानक परिसरात संशयित रीत्या फिरत असलेल्या युवकाला ताब्यात घेतले. त्याची चैकशी केली असता अट्टल गुन्हेगार असल्याचे पुढे आले. त्याच्याजवळून बुट्टीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जप्त करण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

अमोल नामदेव सगने, (वय 33) रा. लालपोल आजादनगर कोर्ट रोड मु.पो. परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती असे या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याजवळ असलेली एम.एच. 40 एएफ 0130 क्रमांकाची मोपेड बुटीबोरी येथून चोरल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेत बुट्टीबोरी पोलिस ठाण्यात माहिती दिली.

या आरोपीवर नागपूर, भुसावळ, अकोला, अमरावती, परतवाडा तसेच रेल्वे कायद्यांर्तगत बरेसचे गुन्हे दाखल असून सदर आरोपी हा खून तसेच चोऱ्याच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगलेला आहे. त्याला पुढील कार्यवाही करीता बुटीबोरी पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे ठाणेदार सत्यवीर बंडीवार, डी.बी. चे पथकाने जमदार दिवाकर परीमल, सुभाष गावंड, पवन निलेकर यांनी सदर चोरट्याला ताब्यात घेतले.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT