water scarcity issue in melghat of amravati 
विदर्भ

नैसर्गिक स्त्रोत आटले, कृत्रिम पाणवठे झाले कोरडे; मेळघाटात पाणीटंचाईच्या झळा

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती ) : मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने वन्यप्राण्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सोबतच कृत्रिम पाणवठेही कोरडे पडल्याने पाण्याअभावी मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील वन्यप्राण्यांची पाण्यासाठी पळापळ सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय 23 मार्च रोजी धारणी मार्गावर नीलगायला पाण्यासाठी भटकंती करताना जीव गमवावा लागल्याची घटना घडली. वन्यप्राण्यांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ येऊ नये म्हणून प्रशासनाने पाणीटंचाई दूर करण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे.

मेळघाटच्या जंगलामधील जलवाहिन्या म्हणून सिपना आणि गडगा या दोन नद्या ओळखल्या जातात. जंगलातील छोट्या-मोठ्या ओहळांना त्या स्वत: सामावून घेतात. परंतु, आज परिस्थिती अशी आहे की या दोन्ही मुख्य नद्यांसह अन्य नदी-नाल्यांमध्ये पाणीच साठवले जात नाही. पावसाचे पाणी तापी नदीतूनच वाहून जाते, यावर उपाययोजना होणे आवश्‍यक असताना अद्यापही नदी-नाल्यांमधील पाणी अडवण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. परंतु, नियोजनाअभावी प्रशासनाचे प्रयत्नही फोल ठरत आहेत. प्रशासनाने जर मनात आणले तर प्रत्येक नाल्यावर सिमेंट बंधारे बांधून जंगलातील वन्यप्राण्यांच्या पाण्याची व्यवस्था जंगलातच केली जाऊ शकते. परंतु, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. हतरू, रायपूर, चौराकुंड, हरिसाल आणि ढाकणा हे व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र भीषण पाणीटंचाईने व्यापलेले आहे. दरवर्षी, निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईने वन्यप्राणी कासावीस होत असून पाण्यासाठी वन्यप्राणी तापी नदीत ठराविक ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर अवलंबून आहेत. दुष्काळाने होरपळून निघालेल्या आदिवासी भागात रोजगाराची कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली. रोजगार हमी योजनेत जल व वनसंवर्धनाच्या कामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु तो निधी केवळ रस्ते व नाल्यांच्या कामांसाठी उपयोगात आणला जातो. व्याघ्रप्रकल्पातून वाहनाऱ्या नद्या व नाल्यांचे पाणी जंगलातच अडवणे आवश्‍यक आहे. परंतु, त्याबाबत कामेच होताना दिसत नसल्याने निसर्गप्रेमींनी खंत व्यक्त केली आहे.

पाणीटंचाई दूर करण्याची गरज -
तहानलेल्या वन्यप्राण्यांना संपूर्ण उन्हाळ्यात गारवा देणारे नैसर्गिक वातावरण असणे आवश्‍यक आहे. कारण अलीकडच्या काळात व्याघ्रप्रकल्पाची जंगले वन्यप्राण्यांसाठी उजाड झाली असल्याचे दिसते. जंगलात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईने दाहकतेचा इशारा देत चुणूक दाखविली आहे. वन्यप्राण्यांची पाण्याअभावी होणारी पळापळ ही व्याघ्रप्रकल्पाच्या हिताची नाही. त्यामुळे प्रशासनाने वन्यप्राण्यांसमोर निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे.

वनविभागाला राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मिळतो. मात्र, वनविभाग ही सर्व कामे कागदोपत्री करीत आहे. त्यामुळे मेळघाटातील प्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यामध्ये प्राण्यांचा जीवसुद्धा जात आहे. त्यासाठी वनविभागाने जागोजागी कृत्रिम पाणवठे तयार करणे प्राण्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल.
-रमेश तोटे, मेळघाट.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT