water scarcity plan not done by rural water supply department in amravati 
विदर्भ

दरवर्षी अमरावतीवर कोसळतेय पाणी टंचाईचे संकट, यंदा मात्र टंचाई आराखड्याचा पत्ताच नाही

सुधीर भारती

अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागात यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी दिसत असून फेब्रुवारी महिना आल्यानंतरही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई आराखडा तयार करण्यात आलेला नाही. तालुकास्तरावरून नियोजन करण्यात येत असून अद्याप तीन ते चार तालुक्‍यांनी आराखडा तयार केला आहे.

जिल्ह्यातील टंचाईचा विचार करता मागील वर्षी चिखलदरा तालुक्‍यात सर्वाधिक टंचाईच्या झळा बसल्या होत्या. शंभरावर गावांमध्ये तीव्र स्वरूपाची टंचाई निर्माण झाली होती तसेच जवळपास 30 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र, यंदा पावसाळ्यात समाधानकार पाऊस झाल्याने टंचाईची तीव्रता अद्याप जाणवत नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाणीटंचाई कृती आराखड्याचे विविध टप्पे असून ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी या टप्प्यात अद्याप टंचाई नाही. मात्र, पुढील महिन्यात काही गावांमध्ये ती निर्माण होणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांना उपाययोजना पाठविण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत तीन ते चार तालुक्यांचेच अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरित ठिकाणी हे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.   

पाणीटंचाई निर्मूलन आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातुळीवर सुरू आहे. सध्या टंचाई निर्माण झालेली नाही. आराखडा लवकरच मंजूर केला जाईल.
-के. टी. सावळकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि. प.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT