विदर्भ

कुरळा गेले राहून, चाकातीर्थ आले धावून; मा(लेगावचे)झे मडके (कधी) भरी?

सकाळ वृत्तसेवा

वाशिम : अकोला जिल्ह्याचा दौरा आटोपून वाशीम जिल्ह्यात प्रवेश केला. सकाळे वाशीम जिल्हा बातमीदार राम चौधरी यांच्यासोबत फोनवर सविस्तर चर्चा झालीच होती. त्यानुसार प्रवासाचा मार्ग ठरविला. मालेगाव तालुक्यातील मेडशी या जिल्ह्याच्या प्रवेशद्वारी ‘सकाळ’चे मालेगाव तालुका बातमीदार प्रा. अरविंद गाभणे यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत ‘सकाळ’चे मुंगळा येथील बातमीदार अनंता कुटे होते. मेडशी येथे सरपंच शेख जमीरभाई शेख गनीभाई यांची भेट झाली. पंचायत समितीचे माजी सभापती शेख गनीभाईसुद्धा उपस्थित होते. शहरातील पाणीप्रश्न (Water question) मोठा बिकट असल्याचे उभयतांच्या बोलण्यातून लक्षात आले. पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगताच, सध्या असलेली पाणीपुरवठा योजना मेडशी गावासाठी पुरेशी नाही. आगामी ३० वर्षांचा विचार करून उर्ध्व मोर्ण प्रकल्पावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शुद्धीकरण केंद्र उभारणी, नवीन पाइपलाइन, दुरुस्ती याचा समावेश या योजनेत असल्याचे जमीरभाई यांनी सांगितले. पाणीटंचाईचे नेमके कारण काय, हे जाणून घेण्यासाठी मग आम्ही पुढे निघालो. (What exactly is the cause of water scarcity?)

मालेगाव शहराचे आराध्यदैवत असलेल्या श्री ढवळेश्वर संस्थानला भेट दिली. शहराला बऱ्याच वर्षांपासून पाणीपुरवठा करणाऱ्या नळगंगा विहिरीची पाहणी केली. या विहिरीत मालेगाव लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या जवळ असलेल्या विहिरीतून पाणी सोडले जाते. त्या विहिरीची पाहणी केली. येथील पाणीपुरवठा योजना ३० वर्षांपूर्वीची असल्याने शहराच्या केवळ २५ टक्के एवढ्याच भागाला पाणीपुरवठा होत असल्याचे समजले. परिसरात मार्च महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई जाणवते. उन्हाळा सुरू होताच भूजल पातळी खालावते. बोरवेल आटतात.

एप्रिलपासून बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी चाकातीर्थ लघू पाटबंधारे प्रकल्पावरून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी नगर पंचायतीने शासन दरबारी प्रस्ताव सादर केला. या पाइपलाइनची लांबी नऊ किलोमीटर राहणार असल्याचे समजते. पाणीपुरवठा योजनेत चाकातीर्थ लघुपाटबंधारे प्रकल्पाजवळ जॅकवेल होणार आहे. मालेगाव शहरात प्रभाग तीन, पाच व १७ मध्ये पाणीपुरवठा योजनेच्या टाक्याही प्रस्तावित आहेत.

पुढील ३० वर्षे विचारात घेऊनच नवी योजना व्हावी

शहरात नवीन चांगल्या प्रतीच्या (एचडी) जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तलावावरून पाणी आणण्यासाठी उत्तम प्रतीचे (डीआय) पाइप वापरण्यात येणार आहेत. सोलर पम्पिंगने पाणी आणण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे संचालन स्वयंचलित राहणार आहे. आगामी ३० वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन ही पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. ३० कोटी ८२ लाख रुपये अंदाजित खर्चाची ही योजना आहे. तिला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिलेली असल्याचे समजले. या प्रकल्पावर पाणीआरक्षण १.३० एमएलडी होते. तर मालेगाव शहरासाठी ७.१० एमएलडी पाणी आरक्षित होणे गरजेचे होते. त्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळण्यास अडथळा निर्माण होत होती. त्याबाबत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन पाणी आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी दिली.

मालेगाव शहरासाठीची प्रस्तावित पाणीपुरवठा योजना अनेक दिवसांपासून काही प्रशासकीय, तांत्रिक त्रुटींमुळे लालफितशाहीत अडकली होती. यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तांत्रिक त्रुटी दूर करून यावर्षी सुधारित ३० कोटी ८२ लाख रुपयांच्या नवीन प्रस्तावाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला. लवकरच मंजुरी मिळून काम सुरू करण्यात येईल. ज्यामुळे पाण्यासारखा महत्त्वाचा प्रश्न कायमचा सुटेल.
- अमित झनक, आमदार, रिसोड विधानसभा मतदारसंघ
पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. पाणी आरक्षित झाल्यानंतर या योजनेला अंतिम मान्यता मिळण्यातील अडसर दूर झाला आहे. आता लवकरच या योजनेला कायम मान्यता मिळेल. त्यानंतर कामाला गती येईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.
- डॉ. विकास खंडारे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, मालेगाव
नगर पंचायतीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर शहराच्या पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रयत्न केले. शहराला कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पावरून पाणीपुरवठा होत आहे. विहिरीचे पाणी फेब्रुवारीनंतर कमी होते. त्यामुळे चाकातीर्थ लघुपाटबंधारे प्रकल्पावरून कुरळा येथील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत पाणी सोडून तेथून शहराला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली होती. परंतु प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी चाकातीर्थ लघू पाटबंधारे प्रकल्पावरून सरळ मालेगाव शहरात पाणी आणून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला. मान्यतेसाठी फाईल मुंबई मंत्रालयात सादर केली. आता तलावावरील पाणी आरक्षणचा मार्ग मोकळा झाला. लवकरच योजनेस प्रशासकीय मान्यता मिळेल.
- रेखा अरुण बळी, माजी अध्यक्ष, नगर पंचायत
एप्रिल महिना येताच मालेगाव शहरात भीषण पाणीटंचाई जाणवते. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागते. एप्रिल महिना सुरू होताच मालेगाव शहरात स्वखर्चाने टॅंकरने नागरिकांना सतत तीन महिने पाणी वाटप केले जाते. यंदा कोरोनामुळे नागरिकांना पाणी वाटप करणे शक्य झाले नाही. शहरात पाच बोअरवेल केल्या. त्यांना पाणी लागले असून, काही प्रमाणात नागरिकांना मिळत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून लाखोंचा खर्च करण्यात येतो. कुरळा तलाव पाणीपुरवठा योजनेत पाइपलाइनचे काम योग्य पद्धतीने केले असते तर शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला नसता.
- चंदू जाधव, माजी नगरसेवक, नगर पंचायत

(What exactly is the cause of water scarcity?)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT