file photo
file photo 
विदर्भ

बचतगटाने तांदूळ आणला कुठून?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पोषण आहार पुरविण्यासाठी निवडण्यात आलेल्या बचतगटांना जिल्हा परिषदेमार्फत अद्याप तांदळाचा पुरवठाच केला नसताना सौरभ महिला विकास मंचने प्रतापनगर शाळेत अळ्या असलेला भात कुठून आणला, यावर प्रश्‍चचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रतापनगर प्राथमिक विद्यालयात गुरुवारी (ता. 18) शालेय पोषण आहारातील शिजविलेल्या अन्नात अळ्या आढळल्याने खळबळ उडाली. या शाळेला पोषण आहार पुरविण्याचे कंत्राट सौरभ महिला विकास मंच या बचतगटाला दिले आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीद्वारे शहरातील दहा महिला गटांना पोषण आहाराचे कंत्राट देण्यात आले. कंत्राट वाटपात गोलमाल असल्याचे सुरुवातीपासूनच बोलले जात आहे. दहापैकी इस्कॉन आणि अक्षयपात्र फाउंडेशन यांनी अद्याप पोषण आहाराचे वाटप सुरूच केलेले नाही. मात्र, इतर आठ गटांनी शिजविलेला पोषण आहार देण्यास सुरुवात केली. नियमानुसार पोषण आहारासाठी जिल्हा परिषदेकडून धान्याचा पुरवठा केल्यावरच पोषण आहारात त्याचा समावेश केला जातो. मात्र, हा पुरवठा झाला नसल्याने आठही बचतगटाकडून स्वत:च्या धान्याचा वापर करण्यात आल्याचे समजते. विविध आठ बचतगटाच्या नावावर कंत्राट घेऊन एकच व्यक्तीतर्फे पुरवठा केला जात असल्याचीही चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT