file photo 
विदर्भ

असे का घडले? - शेतमालाचे भाव गडगडले

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पेरणीच्या वेळी भाव वाढतील या आशेने ज्या शेतकऱ्यांनी शेतमाल न विकता मागे ठेवला त्यांच्या पदरी आता निराशा आली आहे. गेल्या सप्ताहात सर्वच शेतमालांचे भाव बाजारात पडले आहेत. शासनाचा हमीभावही मिळणे कठीण झाले आहे.

नगदी पिकांचे भाव पडू लागले 

खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या नगदी पिकांचे भाव पडू लागले असून हमीभावाची आस शासकीय नियम, निकष तसेच अटी व शर्तीमुळे मृगजळ ठरले आहे. हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनने चार हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. तो आता चार हजारांवरून खाली उतरला आहे. शासनाने सोयाबीनला या ंहंगामात 3,710 रुपये प्रतिक्विंटलचा भाव जाहीर केला. गतवर्षीच्या तुलनेत 311 रुपयांनी वाढ केली. मात्र खुल्या बाजारातील भाव हमीभावपेक्षाही अधिक राहल्याने शेतकऱ्यांनी खुल्या बाजाराला पसंती दिली. अधिक भाव वाढतील या आशेने काही शेतकऱ्यांनी शेतमाल मागे ठेवला, त्यांची आता पंचाईत झाली आहे. सद्यस्थितीत खुल्या बाजारात 3920 ते 3952 असा भाव आहे. हमीदराच्या तुलनेत हा भाव अधिक असला तरी तो बोटावर मोजण्याइतक्‍या शेतकऱ्यांना मिळतो ही वस्तूस्थिती आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 3200 रुपयांपासून भाव मिळत आहे.

खासगी व्यापाऱ्यांची खरेदी तिपटीने

खरिपातील दुसरे नगदी पीक कापसालाही खुल्या बाजारात हमीदरापेक्षा कमी भाव मिळत आहे. प्रतिक्विंटल 5 हजार ते 5200 रुपये भाव पदरी पडत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाची तरतूद असली तरी शासनाचे नियम, निकष, अटी व शर्तींच्या गराड्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी तो पडत नाही. त्यामुळेच शासकीय खरेदीच्या तुलनेत खासगी व्यापाऱ्यांची खरेदी तिपटीने आहे. तुरीचे भाव आगमनातच पाडण्यात आले आहेत. तुरीला यंदा शासनाने 5800 रुपये प्रतिक्विंटल भाव दिला असला तरी खरेदी मात्र सुरू केलेली नाही. नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सोयाबीन व कापसाला फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तूरीपासून अपेक्षा आहेत. खुल्या बाजारात पाच हजारांवर भाव नाहीत. 4,700 रुपये प्रतीक्विंटलपासून व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे. 

 दुष्काळ सहन करण्याची वेळ 

खरिपातील पिकांच्या विक्रीत दैना होत आहे. हंगामाच्या प्रारंभी सोयाबीन वगळता उर्वरित नगदी पिकांना मात्र भाव मिळालेले नाहीत. त्यांच्या भावातील पडझड कायम आहे. निसर्गाने साथ न दिल्याने उत्पादन फार झालेले नाही. ओला दुष्काळ सहन करण्याची वेळ आली असताना बाजारातही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT