यवतमाळ : आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकताना बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक. 
विदर्भ

असे का घडले? - यवतमाळात कापूस खरेदीसाठी शेतकरी झाले आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ  : ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे "नाफेड'ने कापसाची खरेदी बंद झाली असल्याचे जाहीर केले. त्यामुळे येथील बाजार समितीमध्ये टोकन देणे गेल्या दोन दिवसांपासून बंद केले होते. म्हणून संप्तत झालेल्या शेतकऱ्यांनी आज गुरुवारी (ता.नऊ) बाजार समितीसमोरच रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बाजार समितीच्या सभापतींनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकरी शांत झालेत.राज्य कापूस पणन महासंघाने कापूस खरेदी सुरू केली आहे. 

 तीन ठिकाणी ही कापूस खरेदी

यवतमाळ शहरात तीन ठिकाणी ही कापूस खरेदी केली जात आहे. यासाठी बाजार समितीकडे नोंदणी करून टोकण घेणे आवश्‍यक आहे. यवतमाळ बाजार समितीत तशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. मात्र, पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून "नाफेड'ने खरेदी बंद केली आहे. परिणामी दोन दिवसांपासून शेतकरी बाजार समितीबाहेरच आहेत. दोन दिवसांपूर्वी 60 गाड्यांना टोकण देण्यात आले. त्यानंतरही जवळपास 150 गाड्या बाहेरच होत्या. त्यातील 25 गाड्यांना टोकण दिल्यानंतर शेतकऱ्यांना परत जाण्याची विनंती केली होती. शेतकरी परत गेलेत, त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी गर्दी केली. 

"नाफेड'ची खरेदी बंद 

"नाफेड'ची खरेदी बंद असल्याने टोकण देणे बंद होते. दोन दिवसांपासून शेतकरी बाहेर ताटकळत असल्याने शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला. म्हणून कापूस खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीलगतच्या यवतमाळ-धामणगाव हा महामार्गच रोखून धरला. त्यामुळे काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिस व बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक यांनी घटनास्थळ काढले. "नाफेड'च्या प्रशासनाला आंदोलनाची माहिती देण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांना खरेदी सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare Uddhav Thackeray : सुनिल तटकरेंनी उद्धव ठाकरेंना दिला तगडा झटका! रायगडमधील ठाकरेंचा प्रमुख शिलेदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

Tukaram Mundhe: परदेशात एक नियम, भारतात दुसरा का? तुकाराम मुंढेंनी ग्लोबल फूड कंपन्यांना सुनावलं; नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित

Subsidy for Trekking Route Homestays: ट्रेकिंग ट्रॅकवरील गावांमध्ये 'होम-स्टे' उभारण्यासाठी सरकारी अनुदान; जाणून घ्या विशेष योजना

Thane: आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींचा विनयभंग, ५९ वर्षीय कर्मचाऱ्याला अटक, सेवेतून निलंबित; अधीक्षिकेवरही ठपका

Maharashtra Monsoon Prediction : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल

SCROLL FOR NEXT