file photo 
विदर्भ

योजनांचे अनुदान का होतेय लाभार्थ्यांच्या खात्यात जमा...वाचा

राज इंगळे

अचलपूर(अमरावती)ः सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची कार्यवाही ऑनलाइन झाली आहे. या योजनांतील लाभार्थ्यांचे बॅंकेत खाते उघडून थेट अनुदान त्यांच्या खात्यात जमा केले जात आहे. यातून कामकाजातील कागदपत्रांचा त्रास कमी झाला, शिवाय अनुदानासाठी लाभार्थ्यांच्या आरोग्यकेंद्रात चकरा मारणे बंद झाले आहे. परिणामी आरोग्य विभागाचा कारभार शंभर टक्‍के कॅशलेस झाल्याचे दिसून येत आहे. 

काही वर्षांपूर्वी आरोग्य विभागात योजनांचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नव्हते. अनुदान येऊनही लाभार्थ्यांच्या हातात पडण्यात बराच कालावधी लागत होता. त्यामुळे लाभार्थ्यांना वारंवार अनुदानासाठी आरोग्यकेंद्राचे उंबरठे झिजवावे लागत होते. त्यामुळे अनुदान मिळणेही कठीण झाले होते, त्यानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात कॅशलेस व्यवहारांचा बोलबाला सुरू झाला. केंद्र सरकारने राज्यांना त्यांच्या विविध विभागांतील व्यवहार कॅशलेस करण्याच्या सूचना दिल्या, त्यानुसार आरोग्य विभागानेसुद्धा कामकाज करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात यात अनेक अडचणी आल्या, त्यानंतर मात्र कामकाजात सुधारणा करत आता सर्वच योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली. आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जननी सुरक्षा योजना, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे मानधन, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, आशा कर्मचाऱ्यांना मोबादला याशिवाय अन्य कारणांसाठी लाभार्थ्यांना देण्यात येणारा निधी अथवा अनुदान थेट रोख स्वरूपात देण्यात येत नसून त्याऐवजी ही रक्कम त्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जात आहे. विविध योजनांत लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांचा आधार नंबर, बॅंक खात्याची माहिती घेऊन ती ऑनलाइन अपलोड केली जात आहे.
त्यामुळे आरोग्य विभाग कॅशलेस झाला, असे म्हणायला हरकत नाही.

मेळघाटही कॅशलेससह ऑनलाइन 
जिल्ह्यासह मेळघाटात आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचे अनुदान देण्यासाठी पूर्वी लाभार्थ्यांना धनादेश दिले जात होते, त्यानंतर पुढील कार्यवाही होऊन पैसे खात्यात जमा होण्यास बराच वेळ लागत होता. विशेष म्हणजे धनादेश तयार करण्यासह अन्य कामकाज करण्यास आरोग्य विभागास बराच वेळ लागत होता. त्यामुळे अनुदान मिळण्यास लाभार्थ्यांना बराच काळ वाट पाहावी लागत होती. आता मात्र सर्व योजनांचे शंभर टक्‍के अनुदान बॅंक खात्यात जमा होत असल्याने ही ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण बंद झाली आहे. सोबतच आरोग्य विभाग कॅशलेससह ऑनलाइनही झाला आहे. 

 
-संपादन ः चंद्रशेखर महाजन
 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT