विदर्भ

'दीपाली चव्हाण प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू' : यशोमती ठाकूर

सकाळ वृत्तसेवा

अमरावती ः दीपाली चव्हाण यांना न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा होत आहे. या प्रकरणी जबाबदार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबनानंतर आता त्यांना अटकही करण्यात आली आहे. याबाबत आपण मेळघाटात दौरा करून वन कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे यंत्रणेकडे सादर केले आहे. या प्रकरणी जबाबदार प्रत्येक दोषीला कठोर शिक्षा होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू, असे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले.

यापुढे असा प्रकार घडू नये म्हणून प्रकरणातील सर्व दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी सतत प्रयत्नरत राहू, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती व त्यानुसार रेड्डी यांचे निलंबन झाले. त्यानंतर मेळघाटात दौरा करून महिला वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ठिकठिकाणी सभा घेतल्या व त्यांची व्यथा जाणून घेतली. याबाबतची माहिती वेळोवेळी चौकशी समितीच्या अध्यक्ष अपर पोलिस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांना दिली. त्यामुळे चौकशीने वेग घेतला व रेड्डींना अटक करण्यात आली आहे

.

कामाच्या ठिकाणी महिला भगिनींचा छळ होण्याची घटना यापुढे कुठेही होऊ नये यासाठी या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी व दोषींना शिक्षा ठोठावण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करू. महाराष्ट्रात महिलाभगिनी अनेक क्षेत्रांत आघाडीने कार्यरत आहेत. अशा ठिकाणी त्यांना काम करताना संरक्षक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. कुठेही अपप्रकार घडत असेल तर महिलांनीही निर्भीडपणे पुढे येऊन तक्रार करावी. मी रोज सर्व तक्रारींचा आढावा घेत आहे, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

विशाखा समित्यांच्या कामाला वेग

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी जबाबदार व्यक्तींना शिक्षा होण्यासाठी शासनाकडून गंभीर पावले उचलण्यात येत आहेत. अशी प्रकरणे घडू नयेत यासाठी प्रत्येक कार्यालयात विशाखा समिती कार्यान्वित करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले असून, समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सचे सनियंत्रण राहणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Varanasi Train: पुणेकरांचे काशीदर्शन झाले सोपे! आता हडपसर वरून थेट वाराणसीला 'अमृत भारत' ट्रेन, PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

Heart Health: वन बॉडी वन हार्ट : जीवनशैली, ताण, चयापचय आरोग्य आणि लवकर तपासणी एकत्रितपणे तुमचा हृदयाचा धोका कसा ठरवतात?

Latest Marathi News Live Update: कोल्हापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला कोर्टात केलं हजर

दहशतवादी संघटनेशी तुमचं कनेक्शन सापडंलय...NIA च्या नावाने डिजिटल अरेस्ट; वृद्धाची 9.5 लाखांची फसवणूक, कसं सुरक्षित राहायचं पाहा

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं की महागलं? दोन दिवसांतच भावात मोठा बदल; आजचा ताजा दर पाहा

SCROLL FOR NEXT