Will Make Maharashtra to No crime state said Director General of Police 
विदर्भ

गुन्हेगारांनो सावधान! आता पोलिसांचा असणार तुमच्यावर 'वॉच'; पोलिस महासंचालकांची माहिती 

अनिल कांबळे

नागपूर ः गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना साकारण्यात येणार असून त्याचा श्रीगणेशा झालेला आहे. राज्यातील प्रत्येक गुन्हेगाराची यादी तयार करून त्यांच्यावर ‘ वॉच’ ठेवण्यात येणार आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई केली जात असून याचे परिणाम येत्या महिन्याभरात दिसतील, असे राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

तडीपार गुंड सर्वाधिक गुन्हेगारीत सक्रिय असल्याचे दिसून येते. हे आरोपी सध्या कुठे आहेत,तडीपारी संपलेले सध्या काय करीत आहेत याची झाडाझडती घेण्याचे निर्देश पोलिस उपायुक्तांना देण्यात आले आहे. तडीपार व तीनपेक्षा अधिक शारीरिक दुखापतीचे गुन्हे दाखल असलेल्या गुंडांची यादी तयार करण्यात येत आहे. 

वारंवार गुन्हे करणाऱ्या गुंड व त्यांच्या टोळींविरूद्ध, स्थानबद्ध, मकोका व महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. अशा गुंडांच्या प्रत्येक दिवसाची हालचालींची माहिती घेण्याचे ‘टार्गेट’ पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त दर आठवड्याला या गुंडांबाबत इत्थंभूत माहिती घेऊन त्याचा अहवाल दर महिन्याला पोलिस आयुक्तांसह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सादर करतील, असे नगराळे म्हणाले.

पाच मिनी फॉरेंसिक लॅब

फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाला वेळ लागतो. त्यामुळे पाच मिनी लॅब वाढविण्यात आल्या आहेत. साक्षीदार व तक्रारदार फितूर होत असल्याने शिक्षेचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी साक्षीदार व तक्रारदार फितूर होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. याशिवाय तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावाच्याही भक्कम आधार घेतला जाईल.

रिक्त जागा पदोन्नतीने भरणार

राज्यात दोन लाखांपेक्षा अधिक पोलिस अधिकारी व अमलदारांची पदे आहेत. त्यापैकी सुमारे २० हजार पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांवर अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती करण्यासाठी आपण मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना विनंती करणार आहोत. नागपुरात रिक्त असलेले पोलिस सहआयुक्त, व सहाय्यक पोलिस आयुक्तपदी लवकरच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असेही नगराळे यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hospital Rules: रुग्णालयांत नवे नियम लागू! पान-गुटखा सेवन करणाऱ्यांना प्रवेशबंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय, आता तंबाखू खाऊन गेलात तर...

Rahul Gandhi : १५२ पेपर लीक, साडेसात कोटी विद्यार्थ्यांना मनस्ताप तरी एकही दोषी नाही, तरुणांनाच शिक्षा; राहुल गांधींचा PM मोदींवर घणाघात

Nagpur Crime : प्रॉपर्टीच्या वादातून सासरच्या नातेवाइकांकडून जावयाचा खून; तीन आरोपींना अटक

Water Supply Close : पुण्यातील या परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

Mumbai News: मुंबईकरांना ३ नवीन बीएमसी रुग्णालये मिळणार! १,१२० खाटांसह विविध सुविधा, कधी सुरु होणार?

SCROLL FOR NEXT