woman arrested for running network of drugs  
विदर्भ

बाप रे! महिला चालवत होती चक्क गांजा तस्करीचे नेटवर्क; तब्बल सात लाखांचा गांजा जप्त 

संतोष ताकपिरे

अमरावती ः ग्रामिण भागात गांजातस्करीचे नेटवर्क एक महिला चालवीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महामार्गावरील एजंटच्या माध्यमातुन माल पुरवठा करण्याचा प्रयत्न करताना त्या महिलेसह दोन साथीदार अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

6 लाख 96 हजार रुपयांचा गांजा, एमएच 27 बीए 3826 क्रमांकाची 30 हजारांची एक दुचाकी, 22 हजारांचा मोबाईल असा एकूण सात लाख 48 हजारांचा माल कारवाई करणाऱ्या पथकाने जप्त केला. 

पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन यांच्या विशेष पथकाने तळेगाव दशासर ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. आपल्या हद्दीतून गांजातस्करी सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळू नये याचेच आश्‍चर्य वाटते.

अरविंद आत्माराम मोहोड (वय 55, रा. चांदुररेल्वे) व सूरज अजय नगरडे (वय 22, रा. धामक) व सुलतानपूर येथील नंदा जाधव अशी अटक तिघांची नावे असल्याचे विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक अजय आखरे यांनी सांगितले.

जप्त गांजा, अटक तिघांना या पथकाने पुढील कारवाईसाठी तळेगाव दशासर पोलिसांच्या स्वाधीन केले. तेथेच तिघांविरुद्ध एनडीपीएस ऍक्‍ट अन्वये शनिवारी (ता 27) गुन्हा दाखल झाला. महामार्गालगत सुलतानपूर वरुन यवतमाळ, अमरावतीसह आसपासच्या जिल्ह्यातील एजंटजवळ सदर महिला गांजाचा पुरवठा करीत होती.

महिलेविरुद्ध ओरिसा, कर्नाटकात गुन्हे

बाहेर राज्यामधुन गांजा आणून विदर्भातील काही जिल्ह्यात तस्करी होते. याप्रकरणात अटक महिलेस यापूर्वी वर्धा, ओरिसा, कर्नाटक येथे अटक झाली होती. असे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय आखरे यांनी स्पष्ट केले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT