Woman dies in accident at Bhandara district 
विदर्भ

हृदयस्पर्शी! मुळ गावी जाण्यासाठी कुटुंबीयांसह निघाला पती; वाटेत पत्नीने सोडली साथ, मुलं अनभिज्ञ

विश्‍वपाल हजारे

लाखांदूर (जि. भंडारा) : पत्नी व मुलांसोबत रात्री दुचाकीने दिघोरी/मोठी येथे जाताना कोदामेंढीजळ भरधाव स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी विवाहितेचा मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह वडील गंभीर जखमी झाले आहेत. मृताचे नाव सुषमा दिलीप रोकडे (वय ३५) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर येथे राहत असलेले दिलीप रोकडे बुधवारी रात्री दुचाकीने त्यांचे मुळ गाव असलेल्या दिघोरी/मोठी येथे जात होते. कोदामेंढी शिवारात विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या स्कॉर्पिओ चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील रोकडे कुटुंबीय हवेत उसळून रस्त्यावर कोसळून जखमी झाले.

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती दिघोरी पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी दिघोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचारानंतर चारही जणांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, जखमी विवाहितेचा उपचारापूर्वी वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या अपघातात दिलीप श्‍यामराव रोकडे (वय ४०), सूरज दिलीप रोकडे (वय १०) आणि वंश दिलीप रोकडे (वय सात) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. दिघोरी पोलिसांनी या घटनेची नोंद करून आरोपी चालक दर्शन संजय मेश्राम (वय ३०) याला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

रस्ता दुरुस्तीमुळे वाढले अपघात

लाखांदूर-सानगडीदरम्यान दोन वर्षांपासून रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्याचे काम बऱ्याच काळापासून रेंगाळले असून, अनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे वाहनांच्या वर्दळीमुळे सतत धूळ उडते. त्यामुळे सतत अपघाताच्या घटना घडत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

SCROLL FOR NEXT