Workers in Bajar Samiti are back to work in Amravati  
विदर्भ

अखेर स्थानिक कामगार कामावर परतले; परप्रांतीय माथाडी कामगारांना समितीबाहेर काढण्याचे दिले आश्वासन 

कृष्णा लोखंडे

अमरावती ः परप्रांतीय माथाडी कामगारांना  बाजार समितीबाहेर काढण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर स्थानिक हमाल कामावर परतलेत. मात्र खरेदीदारांनी परप्रांतीयांना कामावरून काढण्यास नकार दिल्याने गतिरोध अजूनही कायम आहे. दरम्यान, बाजार समितीत दोन हजार पोत्यांचा लिलाव झाला, मात्र त्यानंतर लिलावाची प्रक्रिया पुन्हा रखडली. सभापती अशोक दहीकर व उपसभापती नाना नागमोते यांनी पेच सुटला असून लिलाव सुरळीत होत असल्याचे म्हटले आहे. पुढील आदेशापर्यंत शेतकऱ्यांनी आवक आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.

माथाडी कामगारांच्या दोन गटात झालेल्या मारहाणीच्या घटनेपासून बाजार समितीमधील व्यवहार प्रभावित झाले आहेत. स्थानिक माथाडी कामगारांनी परप्रांतीय माथाडी कामगारांना बाजार समितीबाहेर काढावे, अशी मागणी केली आहे. तर, खरेदीदारांनी त्यास विरोध केला आहे. परप्रांतीय माथाडी कमी पैशांत अधिक काम करीत असल्याचा त्यांचा दावा असून त्यांनी या माथाडींना आश्रय दिला आहे. या वादात तोडगा काढण्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले प्रयत्न निष्फळ ठरू लागले आहेत.

बुधवारी सकाळी लिलावास सुरवात करण्यात आली. अडत्यांनी सोयाबीनच्या लिलावास सुरवात केली. सोयाबीन व तुरीच्या दोन हजार पोत्यांचा लिलाव झाला व दोन तीन खरेदीदारांनी हा शेतमाल विकत घेतला. अडते पुढील लिलाव पुकारणार एव्हढ्यात हमालांनी पुन्हा कामबंदचे शस्त्र उगारल्याने लिलावात अडचणी निर्माण झाल्यात. हमाल व खरेदीदारांमध्ये पुन्हा वाद झाला. अखेर खरेदीदारांनी लिलाव बंद पाडून तेथून निघून जाणे पसंत केले. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही शेतमालाचा लिलाव पूर्ण होऊ शकला नाही.

सभापती अशोक दहीकर यांनी मात्र लिलाव सुरळीत सुरू झाल्याचा दावा केला असून समितीच्या यार्डात असलेल्या सर्व शेतमालाचा लिलाव होईस्तोवर नवीन आवक स्वीकारणार नसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत शेतमाल विक्रीसाठी आणू नये असे आवाहन केले आहे.

व्यापारी संचालक नापास

बाजार समितीत खरेदीदार अडते व व्यापारी यांचे प्रतिनिधित्व करणारे संचालक आहेत. तसेच माथाडी कामगारांचेही प्रतिनिधित्व करणारे संचालक आहेत. पेचप्रसंगातून तोडगा काढण्यात उभयतांचे प्रयत्न तोकडे पडू लागले आहेत. दोन्ही गटातील संचालकांची या प्रकरणातील भूमिका बघ्याची ठरली असून ते नापास झाले आहेत, अशी चर्चा बाजार समितीत रंगली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

Raj Thackeray IIT Bombay : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टच बोलले; शिक्षणव्यवस्थेवरही सवाल

Marathi News Live Updates : 'आयुष्मान भारत' योजनेतंर्गत ६० कोटी भारतीयांना ५ लाखांचे आरोग्य कवच उपलब्ध- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Solapur Cyber Fraud,पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला ४५ लाखांचा गंडा, जादा नफ्याचे आमिष महागात; वर्षाला २८ लाखांचे आहे पॅकेज

SCROLL FOR NEXT