yavatmal corporation take action against 16 traders for violation of corona rules 
विदर्भ

गर्दी करणे, मास्क न लावणे भोवले; १६ व्यापाऱ्यांना प्रशासनाचा दणका

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने नियमावली लागू केली आहे. मात्र, नियमांचे पालन होत नसल्याने शहरात कारवाई केली जात आहे. गुरुवारी (ता.25) महसूल, पालिका तसेच पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. यात शहरातील 16 व्यापाऱ्यांना तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेची वेळ पाच वाजेपर्यंत केली आहे. नागरिकांना मास्क वापरने बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानात पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात सात पथके तयार करण्यात आली आहेत. बुधवारी (ता.24) पर्यंत मास्क न घालणाऱ्यांकडून 89 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गुरुवारी (ता.25) शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रशासनाने कारवाई केली. दुकानात पाच पेक्षा जास्त ग्राहक असलेल्यांवर कारवाई केली. यात सराफा, कपडा अशा विविध 16 व्यापाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड दिला. विनामास्क फिरणाऱ्यावरही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून पाचशे रुपये वसूल करण्यात आले. शहरातील विविध भागात सात पथकाने वेगवेगळ्याठिकाणी कारवाई केली. या कारवाईत तहसीलदार कुणाल झाल्टे, मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, डॉ.विजय अग्रवाल, शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक चोपडे यांच्यासह महसूल, पोलिस तसेच पालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

शहरात दंडात्मक कारवाई -
शहरात कोरोनासंसर्ग वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर नियमावली तयार केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून शहरात सात पथके कार्यान्वित झाली आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT