Young boy is no more in fight over tractor in Amravati
Young boy is no more in fight over tractor in Amravati 
विदर्भ

ट्रॅक्टरमुळे धूर उडाला म्हणून झाला वाद आणि मारहाणीत 'त्याला' गमवावा लागला जीव; अमरावती जिल्ह्यातील घटना

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती): तालुक्यातील लिलाव न झालेल्या रेतीघाटातुन रेतीची खुलेआम तस्करी होत असून यावर तिवसा महसूल विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने रेतीची दिवसाढवळ्या चोरी होत आहे. यातूनच रेतीच्या तस्करी वरून मारहाणीत एका युवा ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाल्याची घटना धामंत्री येथील रेती घाटात घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

संकेत मारोतराव भगत (वय २१, रा. वरखेड) असे मृतक ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. तो नेहमीप्रमाणे गुरुवारी (ता.११) धामंत्री येथील रेती घाटातून रेती घेत होता. याच ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील टाखरखेड येथील चार युवक दारू पिण्यासाठी अमरावती जिल्हाच्या हद्दीत आले होते. घाटातून रेतीने भरलेला ट्रॅक्टर घेऊन जात असताना ट्रॅक्टरच्या चाकाचा धूर उडाल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. 

यात संकेतला छाती, गुप्तांगात, डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याला गुरुवारी (ता.११) रात्री उशिरा तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही वेळातच त्याला अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले. परंतु दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिवसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिस निरीक्षक रिता उईके यांनी वेगाने चक्र ङ्किरवित यातील एका संशयित आरोपीला अटक केली. त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर इतर आरोपीच्या मार्गावर तिवसा पोलिस आहेत. 

मात्र या प्रकरणामुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून या अवैध रेतीवर कारवाईची मागणी जन सामान्यांतुन केली जात आहे. या प्रकरणात अद्यापही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, त्या‘ुळे अधिकृत दाखल झालेला नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले. 

रेती तस्करीला लगाम कधी?

तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेतीची चोरी होत आहे. मात्र यावर महसूलसह तिवसा पोलिसांचे कुठलेही नियंत्रण नसल्याने एक प्रकारे रेती चोरण्याकरिता खुली सूट दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या लिलाव न झालेल्या घाटातून रेतीची तस्करी होत आहे. यातूनच हाणामारी व हत्येच्या घटना घडत आहे. त्यामुळे कुठेतरी महसूल विभाग व तिवसा पोलिसांनी कठोर पावले उचलू कारवाई करण्याची गरज आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT