Young man threatening to cheat on girlfriend in love affair 
विदर्भ

प्रेमप्रकरणात युवकाची मैत्रिणीसह तिच्या आतेबहिणीला फसविण्याची धमकी

संतोष ताकपिरे

अमरावती : प्रेमप्रकरणानंतर त्याने प्रेयसीपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला असता ती लग्नासाठी तयार होत नव्हती. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने स्वत: आत्महत्या करून प्रेयसीसह तिच्या आतेबहिणीला फसविण्याची धमकी दिली.

अमित भेंडे (वय 26, रा. खरांगणा), असे त्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका 20 वर्षीय युवतीच्या तक्रारीवरून मंगरूळदस्तगीर पोलिसांनी संशयित आरोपी अमितविरुद्ध विनयभंगासह आत्महत्या करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मंगरूळदस्तगीर ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका गावातील युवतीची बऱ्याच दिवसांपासून अमितसोबत ओळख होती. युवती घरी एकटी असताना त्याने फोन करून नोंदणी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला. 

परंतु, प्रेयसीने त्याला नोंदणी विवाहासाठी नकार दिला. प्रेयसी लग्नासाठी टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच लग्न केले नाही तर आत्महत्या करून प्रेयसीसह कुटुंबीयांना फसविण्याची धमकी अमितने दिली. नकारानंतर त्याने युवतीच्या मागे लग्नासाठी तगादा लावणे सुरूच ठेवले. फोनवरून सतत सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून युवतीने स्वत:चा फोन बंद करून ठेवला होता. 

ती टाळाटाळ करीत असल्याचे बघून तिच्या आतेबहिणीसोबत त्याने संपर्क साधला. आतेबहिणीने त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल तिच्या कुटुंबीयांना माहिती दिल्याचा रोष त्याच्या मनात होता. त्याने तिच्या आतेबहिणीलासुद्धा यात सहभागी म्हणून फसविण्याची धमकी दिली, असा आरोप पीडितेने मंगरूळदस्तगीर ठाण्यात दाखल तक्रारीतून केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अमित भेंडेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 

तिने फोन न उचलल्याची खंत

बडनेरा परिसरात दुसऱ्या एका घटनेत संशयित आरोपी राहुल शेळके (वय 28, पोहरा) याने युवतीला अडविले व संपर्क करूनही फोनला प्रतिसाद का देत नाही, अशी विचारणा केली. त्याला टाळले असता राहुलने तिची छेडखानी केली. बडनेरा पोलिसांनी राहुलविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: एकीकडे टेस्लाची मुंबईत धमाकेदार सुरुवात; तर दुसरीकडे इलॉन मस्कवर पडला पैशांचा पाऊस

Hutatma Express:'हुतात्मा एक्स्प्रेसने दरवर्षी दहा लाख नागरिकांचा प्रवास'; सोलापूर-पुणे मार्गावर २४ वर्षांपासून सेवा

Pune Crime : तुमची लायकी नाही...भावी पोलिसांना गावगुंडांची बेदम मारहाण; पुण्यातील तळजाई टेकडीवर नेमकं काय घडलं?

Pune News: अवजड वाहनांची धोकादायक वाहतूक; अपघातांचे सत्र , मुंढवा, मांजरी, वाघोली, महंमदवाडीतील प्रकार

LA 2028 Olympics Schedule : ऑलिम्पिकचं वेळापत्रक जाहीर! क्रिकेट, हॉकीसह कोणत्या स्पर्धा कधी, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT