youth doing good farming and earning good money  
विदर्भ

युवकांचा आधुनिक शेतीकडे कल; नवनवीन प्रयोगातून उत्पादनात वाढ; महिन्याला 20 ते 25 हजारांचा नफा

किशोर वालदे

साखरीटोला (जि. गोंदिया) ः उच्चशिक्षित युवकांचा आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे कल वाढला असून, कडोतीटोला येथील एका युवकाने शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पादनात वाढ केली आहे. यातून त्यांना महिन्याकाठी 20 ते 25 हजार रुपये नफा होत आहे.

आजच्या युगात शेती ही आधुनिक पद्धतीने करणे हाच एक उत्तम पर्याय आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती शक्‍य होणार नाही, असेच विचार आता ग्रामीण क्षेत्रातील युवक व शेतकऱ्यांत दिसत आहेत. त्यामुळेच आधुनिक शेतीचे ते धडे घेत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान अवलंबून त्याच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करीत आहेत.

कडोतीटोला येथील उच्चशिक्षित नरेश बहेकार हे नोकरीची वाट न पाहता आपल्या वडिलांसोबत आधुनिक शेती करीत असून, एक ते दोन वर्षांपासून एक एकरामध्ये भाजीपाल्याची लागवड करीत आहेत. बटाटे, वांगी, मिरची, टमाटर, अद्रक, कोबी ,भेंडी आदी पिके घेऊन चिल्लर व ठोक भावात ते विकत असतात. यातून महिन्याला 20 ते 25 हजार रुपये नफा मिळत आहे. त्यांना कृषी सल्लागार देवराम चुटे व कृषी सेवक नागदेवे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.

आजच्या युगात प्रत्येकाला नोकरी मिळणे अशक्‍य आहे. त्यामुळे मी निश्‍चय केला की धानपिकांबरोबर भाजीपाला लागवड करून चांगले उत्पन्न मिळवता येतो. मी आधुनिक पद्धतीने धानपिकांसह भाजीपाल्यांची लागवड करतो. यामुळे मला महिन्याला चांगला नफा मिळत आहे.
नरेश बहेकार, युवक शेतकरी, कडोतीटोला.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Jain Boarding Land : पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणात मोठी अपडेट, धर्मादाय आयुक्तांनी दिला स्थगितीचा आदेश

Google Gemini च्या ट्रेंडी प्रॉम्प्ट्ससह दिवाळीत इंस्टाग्रामवर पोस्ट करा खास फोटो

NZ vs ENG: १७ चौकार, ६ षटकार, १६३ धावा! हॅरी ब्रूक अन् Phil Salt यांचे वादळ, न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा

मोनालिसाचं जगप्रसिद्ध पेंटिग असलेल्या संग्रहालयात दरोडा; ४ मिनिटात नेपोलियाच्या ९ वस्तूंची चोरी, राणीचा मुकूट सापडला

Rohit Sharma: 'अरे भाई, त्याला पॉपकॉर्न नको देऊ', रोहितला कॅप्टन गिलसोबत खाताना पाहून मित्र वैतागला

SCROLL FOR NEXT