love 
विदर्भ

नात्यातील युवतीला दिले प्रथम लग्नास आमीष, नंतर दिला नकार... 

संतोष तापकिरे

अमरावती ः त्याने नात्यातीलच युवतीसोबत सूत जुळविले. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. ती गर्भवती झाल्यानंतर तीने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, त्याने तिच्याशी लग्न करण्याऐवजी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर, गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपातासाठी काहीतरी औषध खायला आणून दिले. त्याला अखेर पोलिसांनी अटक केली. त्याला रविवारपर्यंत (ता. नऊ) वलगाव पोलिसांच्या कोठडीत आहे. 

इरफान शहा सुभान शहा (वय 31, रा. तळेगाव ठाकूर) असे पोलिस कोठडीत असलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वलगाव ठाण्यात पीडित युवतीच्या तक्रारीवरून घरात घुसून अत्याचार, अडवणूक, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. असे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले. 

पीडितेवर अत्याचार केल्यानंतर तिला दोन महिन्याची गर्भधारणा झाली. त्यामुळे लग्नासाठी तिने इरफानकडे मागणी केली. परंतु त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. गर्भपात करण्यासाठी त्याने काही औषध एका कागदात गुंडाळून पीडितेला आणून दिले. ते खाण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. पीडितेने इरफानने दिलेले औषध न खाता त्या औषधासह वलगाव ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी इरफानला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT