wedding card
wedding card 
विदर्भ

लग्नासाठी युवकाने दोनदा छापल्या पत्रिका, मात्र कोरोना घेतोय परीक्षा! 

सकाळ वृत्तसेवा

चांदूररेल्वे (जि. अमरावती)  : पौराणिक कथेमध्ये लग्नासाठी स्वयंवरात देव-देवतांना, राजा- महाराजांना विविध परीक्षेला सामोरे जावे लागत असल्याच्या कहाण्या आहेत. त्याचीच पुनरावृत्ती तालुक्‍यात घडत आहे. जिल्ह्याबाहेरून घरी लग्नाकरिता आलेल्या युवकाला कोरोनामुळे लग्नाआधी 14 दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहण्याची परीक्षा द्यावी लागत आहे. परीक्षा देऊनही लॉकडाउनमुळे त्याच्या लग्नाच्या गुलाबी स्वप्नात कोरोनाचा व्यत्यय येतच आहे. 

लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस. विशेष म्हणजे एक दिवसाचा का होईना वर मुलाला नवरदेव म्हणजेच देवाची उपमा दिली जाते. पण यावर्षी अनेक ज्योतिषांनी शुभ दिवस काढून दिला असतानाही लग्नाच्या कार्यात कोरोनाचे मोठे विघ्न आले आहे. अशीच एक घटना तालुक्‍यात ऐकायला मिळत आहे. रोजगारासाठी एक युवक बाहेर जिल्ह्यात गेला होता. तिथे बऱ्यापैकी जम बसला आणि लग्नाचे वयही झाल्याने घरच्यांनी त्याचे लग्न मागील महिन्यात काढले होते. पत्रिकाही छापून वितरित करण्यात आल्या होत्या. परंतु मधातच कोरोनाचे संकट आल्याने लॉकडाउन संपल्यानंतर आता धूमधडाक्‍यात लग्न करू म्हणून त्यांनी मागील तारीख रद्द करून या महिन्यात ठरवीत पुन्हा पत्रिका छापल्या. परंतु सतत वाढत असलेल्या लॉकडाउनमुळे लग्नघरी हिरमोड झाला. शेवटी आहे त्या परिस्थितीत लग्न उरकवायचे, असे ठरवून घरच्यांनी त्या युवकाला गावी बोलावून घेतले. 

लग्नासाठी विलगीकरणाची परीक्षा

मुलगा गावात येताच त्याला प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणात राहण्यास सांगितल्याने मोठीच पंचाईत झाली. शेवटी नवरदेव मुलाने लग्नासाठी विलगीकरणाची परीक्षा देण्याचे ठरवीत आपला मुक्काम गावातीलच एका विलगीकरण कक्षात वळविला. परंतु आता त्याला विलगीकरणातून सुटी मिळत असताना लग्नाची तारीख तोंडावर आली आहे. त्यामुळे तयारीला वेळ मिळाला नाही म्हणून लग्नाची तारीख पुन्हा समोर लोटण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीमुळे दोन्ही लग्नघरचा हिरमोड होत असून परिस्थितीला दोष देण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही पर्याय नसल्याचेही बोलले जाते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT