विदर्भ

अमरावती जिल्ह्यातील जि.प.च्या शाळांना मिळेना हक्काचे छप्पर

सुधीर भारती

अमरावती : एकीकडे जिल्हा परिषद शाळांना अच्छेदिन आणण्याची घोषणा पदाधिकाऱ्यांकडून केली जात असली तरी जिल्हा परिषद शाळांना हक्काचे छप्पर सुद्धा सध्या मिळत नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील ४२० वर्गखोल्या शिकस्त (420 classrooms defeated) श्रेणीमध्ये मोडत असून, या शाळांना आता दुरुस्तीची प्रतीक्षा (Awaiting repair) आहे. मात्र, दोन ते तीन वर्षांपासून निधी उपलब्ध असल्याचे सांगत असतानाच दुरुस्ती मात्र सुरू झालेली नाही. (ZP-schools-in-Amravati-district-did-not-get-the-roof)

अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषदेच्या ४२० शाळांची दुरुस्ती आणि ११६ नवीन वर्गखोल्यांची कामे प्रलंबित आहेत. शिक्षण विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. १४ तालुक्यांतील ४२० वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी १२३ कोटी ५७ लाख तसेच नवीन वर्गखोल्या बांधकामासाठी १३ कोटी ३९ लाख ५० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. मागील वर्षीच हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही कामे सुरू करण्यात आलेली नाहीत.

सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शाळा बंदच आहे. मात्र, ज्या वेळी शाळा सुरू केल्या जातील तेव्हा मात्र विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालूनच शिक्षण घ्यावे लागणार आहे, अशीच परिस्थिती दिसून येते. विशेष म्हणजे जूनमध्ये मोर्शी तालुक्यातील एका शाळेची वर्ग खोली कोसळल्याने अपघात झाला होता. अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी मात्र पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.

तालुकानिहाय नवीन खोल्यांचे प्रस्ताव

अमरावती १३

भातकुली ८

नांदगाव खंडेश्वर २१

चांदूररेल्वे ८

धामणगाव रेल्वे ९

तिवसा ८

मोर्शी ६

वरूड ५

चांदूरबाजार १५

दर्यापूर १३

अंजनगावसुर्जी ८

अचलपूर १३

चिखलदरा ८

धारणी ६

शाळा दुरुस्ती तसेच नवीन बंधकामाबाबत मंजुरी प्रदान करण्यात आली असून, त्यानुसार निधी सुद्धा उपलब्ध आहे. लवकरच प्रशासकीय मान्यता घेऊन कामांना सुरुवात केली जाणार आहे.
- एजाज खान, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

(ZP-schools-in-Amravati-district-did-not-get-the-roof)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT