Viral Photo  esakal
व्हायरल-सत्य

Viral Photo : तुम्हाला पण पनीर आवडतं का? हा फोटो पाहिलात तर खाण्यापूर्वी 10 वेळा विचार कराल!

सणासुदीच्या काळात दूध, दही आणि पनीरच्या विक्रीत लक्षणीय वाढ होते

सकाळ डिजिटल टीम

Viral Photo : सणासुदीच्या काळात दूध, दही आणि पनीरच्या विक्रीत लक्षणीय वाढ होते, कारण लोक विविध प्रकारच्या वस्तू आणि पदार्थ बनवतात. बरं, खास करून पनीर बद्दल बोलायचं झालं तर शाकाहारी लोकांची ती पहिली पसंती आहे. तुम्हाला हे माहित असेलच की पनीर करी वेगवेगळ्या प्रकारे तयार केली जाते.

कोणी मिरची पनीर बनवतात, कोणी पनीर दो प्याजा तर कोणी कढई आणि शाही पनीर बनवतात. पनीरचे हे पदार्थ पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटते, पण सध्या सोशल मीडियावर पनीरचा एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही पनीर खाण्यापूर्वी 10 वेळा विचार कराल.

खरं तर या फोटोत, एक व्यक्ती पनीरवर बसलेली दिसते. खरं तर तो पनीर मधून अतिरिक्त पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याची पद्धत इतकी घाण आहे की हे दृश्य पाहून लोक त्याच्या जागेवरून पनीर विकत घेतील का हा प्रश्न आहे. फोटोत तुम्ही पाहू शकता की लुंगी घातलेली व्यक्ती पनीरमधील अतिरिक्त पाणी कसे काढत आहे.

त्यावर तो लाकडी चाक घेऊन बसलेला असतो. त्याच्या दबावामुळे पनीरधील अतिरिक्त पाणी निघून गेले असेल, पण आता लोकांनी त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हा फोटो उत्तर प्रदेशातील कानपूर येथील असल्याचे बोलले जात आहे.

हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @zhr_jafri नावाच्या आयडीने शेअर केला आहे आणि 'हे पाहिल्यानंतर कधीही नॉन-ब्रँडेड पनीर खरेदी करू नका' असे कॅप्शन लिहिले आहे. हा फोटो आतापर्यंत 60 हजारांहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे, तर शेकडो लोकांनी तो लाईक केला आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोणी म्हणतंय की 'आजकाल ब्रँडेड पनीर पण असच बनवलं जातंय', तर कोणी म्हणतंय की 'घरगुती पनीर बेस्ट'. त्याच वेळी, काही युजर्स आहेत जे 'ब्रँडेडची अवस्था यापेक्षा वाईट आहे' असं म्हणत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran unrest : इराणमध्ये भयानक परिस्थिती! २००० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; सरकारनेही पहिल्यांदाच केलं मान्य

Vijay Hazare Trophy: विदर्भाची सेमीफायनलमध्ये धडक, इशांत शर्माच्या दिल्लीला हरवलं; उपांत्य फेरीत पोहचले 'हे' ४ संघ

Latest Marathi News Live Update : दोन भाऊ एकत्र आल्याचा फायदा होईल

BMC Election Voting: मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलिस सज्ज, २५ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात

Maha Vikas Aghadi : "भाजपने पुण्याला समस्यांच्या गर्तेत लोटले"; काँग्रेस आणि ठाकरे सेनेचा सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप!

SCROLL FOR NEXT