Viral Photoshoot esakal
व्हायरल-सत्य

Viral Photoshoot :  ‘कुणी येणार गं’ लेक, आई, सासू आणि आजी एकाचवेळी प्रेग्नंट !

अगं बाई अरेच्चा! घरातल्या चार पिढ्या एकाचवेळी प्रेग्नंट कशा काय?

सकाळ डिजिटल टीम

घरातील नव्या सुनबाई गोड बातमी देणार हे समजताच घरात जणू दिवाळीच साजरी होत असते. याचं कारण म्हणजे घरातील वृद्धांना आनंद देणारे, मोठ्यांना रिलॅक्स करणारा, लहानग्यांसोबत खेळणारा इटुकला पिटुकला जीव घरात येणार असतो. आजी-आजोबा, पणजी-पणजोबा ही पदवी देणारे बाळ घरात येणार असतं. त्यामूळेच घरात आनंदी वातावरण असतं.

समजा, हा आनंद द्विगुणीत झाला तर, म्हणजे एकाच घरातल्या चार पिढ्यांतील स्त्रीया एकाच वेळी गर्भवती राहील्या तर काय होईल. ते घर धन्यच म्हणावे लागेल. हि गोष्ट सत्यात उतरली आहे. त्याचा एक फोटो जोरदार व्हायरल होतोय. आणि फोटो पाहून नेटकरीही हे असं कसं काय

व्हायरल होत असलेल्या या कुटूंबानेही असेच हटके फोटोशूट करायचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यांच्या फोटोशूटमध्ये  सून सासू एवढंच नाही तर आई आणि आजीही गर्भवती आहेत. या चौघींनीही एकत्र बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

हे फोटो जिबिन जॉय या फोटोग्राफरने काढले आहेत. त्याची पत्नी प्रेगंट आहे. फोटोत दिसणाऱ्या इतर स्त्रीया या पत्नीची आई, आजी, सासू आहेत. पण, त्या काही खरंच प्रेग्नंट नाहीत. तर, त्यांनी केवळ सुनेसारखे पोटावर उशी बांधून फोटोशूट केले आहे.

हि कल्पना जॉयचीच आहे. जेव्हा तिच्या मॅटरनिटी शूटचा विषय आला तेव्हा जॉय याने ही कल्पना कुटुंबासमोर मांडली. त्यांनाही ती आवडली आणि हे फोटोशूट करण्यात आलं. सर्व दाम्पत्याने अगदी आईबाबा होणार असलेल्या दाम्पत्यांप्रमाणेच पोझ दिल्या आहेत.

जिबिनने आऊटडोर फोटोशूट केलं. ते व्हायरल झालं असून अनेक नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देत ही कल्पना आवडली असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

Latest Marathi News Live Update : CJP चे सौरव दास आणि रांका चर्चेसाठी रवाना; थोड्याच वेळात सरकारसोबत बैठक, तोडगा निघणार?

Heart Health Tips by WHO: जगातील 32% मृत्यू हृदयविकारामुळे; WHO चा इशारा, हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा 'या' 5 सवयी

UTU Paper Leak: परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सॲप ग्रुपवर आले प्रश्न; पेपर लीक प्रकरणी असिस्टंट प्रोफेसरला बेड्या!

SCROLL FOR NEXT