पंढरपूर: येथे मंगळवारी सकाळी विप्रदत्त घाटाजवळ गेलेली दर्शन रांग. (छायाचित्र - राजकुमार घाडगे, पंढरपूर) 
वारी

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी साडे अकरा तास

सकाळवृत्तसेवा

तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर भाविकांची गर्दी काही प्रमाणात कमी

पंढरपूर: आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणारे आणि शनिवार, रविवार आणि सोमवारी ईद अशा तीन दिवसाच्या सुट्यांमुळे आलेल्या भाविकांमुळे दोन दिवस येथे गर्दी वाढली होती. आज (मंगळवार) तुलनेने गर्दी काहीशी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तरीही आज श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी साडे अकरा तास लागत होते.

जवळ आलेली आषाढी यात्रा आणि सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे गेल्या दोन, तीन दिवसांपासून शहरात भाविकांची गर्दी वाढली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग स्मशानभूमी पर्यंत जात होती. आज दर्शन रांग कमी होऊन विप्रदत्त घाटाच्या काहीशी पुढे पर्यंत गेली होती. श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर परिसरात देखील आज कालच्या तुलनेत गर्दी काहीशी कमी वाटत होती. दर्शन रांगेवर ता. 26 रोजी सकाळी पोलिस अधिकारी व काही कर्मचारी तैनात करण्यात आले होते. परंतु रात्री नऊच्या सुमारास मात्र तिथे केवळ दोन पोलिस पाहायला मिळाले. दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये यासाठी आता रांगेच्या ठिकाणी अहोरात्र पोलिस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. आज सकाळी साडे दहा वाजता श्री विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेल्या भरत ज्ञानू माटे (रा. कुंभारगाव ता. पाटण जि. सातारा) यांना विचारले असता ते म्हणाले, सोमवारी (ता. 26) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमी शेजारील एक नंबरच्या शेड पासून रांगेत उभा राहिलो होतो. साडे अकरा तासानंतर दर्शन झाले. दर्शन रांगेत व्यवस्था चांगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT