तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्त्वाची मानली जाते सकाळ डिजिटल टीम
वारी

Ashadhi Ekadashi 2023: पांडुरंगाला तुळसीच्या मंजिरीचा हार वाहण्‍यामागचे काय आहे वैशिष्‍ट्ये?

भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये तुळस आणि तिच्या मंजिऱ्या महत्त्वाची मानल्या जातात.

दिपाली सुसर

तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्त्वाची मानली जाते. तुळशीचे पावित्र्य जपण्याला महत्त्व आहे. भारतीय महिला दररोज सकाळी तुळशीची पूजा करून तिला प्रदक्षिणा घालतात. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे, तेवढेच वैज्ञानिक, शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे. लक्ष्मीसमान तुळस सुखदायक आणि कल्याणकारी असल्याचे सांगितले जाते.

तुळशीच्या पानांमध्ये श्रीविष्‍णूची स्‍पंदने आकर्षित करण्‍याची शक्‍ती असते असे सांगितले जाते. श्री पांडुरंग हे श्रीविष्‍णूचे रुप आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्‍याने ती जागृत व्‍हायला मदत होते. त्‍यामुळे मूर्तीतील चैतन्‍याचा लाभ उपासकाला होतो. मंजिरी आपल्‍या स्‍पर्शातून विष्णूतत्‍त्‍वाला जागृत करणारी आहे.

तुळशीची मंजिरी हार वाहण्यामागचे वैशिष्ट्य

तुळशीत श्रीकृष्‍णतत्व असल्‍याने तिच्‍या मंजिरीतून उधळल्‍या जाणार्‍या चैतन्‍यामुळे विठ्‍ठलाच्‍या मूर्तीतील चैतन्‍य जागृत होते आणि त्‍याचे रुपांतर विष्‍णूतत्वात होते, त्‍यातून मग भक्‍तांना चैतन्‍याची अनुभूती येते.

पांडुरंगाच्या छातीवर रुळणारा तुळशीच्‍या मंजिरीचा हार हा मूर्तीच्‍या मध्‍यभागातील स्‍थितीविषयक श्रीविष्‍णूरुपी क्रिया शक्‍तीला चालना देणारा असल्‍याने भाविकांच्‍या सर्व प्रकाराच्‍या मनोकामना पूर्ण होतात.

तुळस ही कृष्णसखी असल्याने पांडुरंगाचीही ती सखीच मानली जाते. त्यामुळे साहजिकच सगळ्या वैष्णव संतांना आणि वैष्णवभक्तांनाही तुळसी विषयी कमालीचे प्रेम आहे.

संत नामदेव म्हणतात,

"तुलसीविण ज्याचे घर। तें तंव जाणावें अघोर।

तेथ वसती यम किंकर। आज्ञा आहे म्हणोनि।। तुलसीवृंदावन ज्याचे घरी। त्यासी प्रसन्न श्रीहरी। तुलसीवृंदावना जे करिती प्रदक्षिणा।

जन्ममरण त्यांना नाही नामा म्हणे।।

पांडुरंगाला तुळस वाहण्याची वेगळी वैशिष्ट्ये काय आहे?

तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्नी असल्यामुळे (पांडुरंग हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी राहते.

म्हणून पांडुरंग हृदयात हवा, तशी प्रत्येकाच्या घरात तुळशीचे रोपटेही हवेच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT