वुमेन्स-कॉर्नर

मासिक पाळीमध्ये तुमचा रक्तस्त्राव किती होतो? कसे मोजाल?

शरयू काकडे

मासिक पाळीदरम्यान, एका व्यक्तीचा(महिलेचा) ३० ते ४० मिलीलीटर किंवा दोन ते तीन टेबलस्पून रक्तस्त्राव होतो असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पण काही संशोधनांनुसार ही आकडेवारी ६० मिलीलीटरच्या आसपास आहे म्हणजे जवळपास ४ टेबलस्पून.

सरासरी रक्तस्त्राव होण्याचा कालावधी हा मोठा असतो, त्यामुळे सरासरी म्हणून मानल्या जाणाऱ्या रक्तस्त्रावापेक्षा काहींना कमी प्रमाणात तर काहींना जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो. तुम्हाला जर कोणत्यांही प्रकारचे तीव्र क्रॅम्पिंग, मळमळ किंवा इतर काही त्रास जाणवत नसेल तर तुमचा वैयक्तिक रक्तस्त्राव नॉर्मल समजला जातो.

तुमचा मासिक रक्तस्त्राव कसा मोजावा, काय आहे लक्षण आणि कधी डॉक्टरला भेटण्याची गरज आहे हे कसे ओळखावे याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

तुमचा सर्वसाधरणपणे किती रक्तस्त्राव होतो हे तुम्ही कसे सांगू शकता?( How can you tell how much you’re actually bleeding?)

मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही रक्तासह इतर गोष्टी देखील शरीराबाहेर पडतात. तुमच्या मासिक पाळीच्या द्रवामध्ये श्लेष्मा ( mucus), ऊती( tissue) आणि गर्भशयाचा पातळ पडदा (uterine lining) मिश्रण देखील असते, ज्यामुळे तुमचा एकूण स्त्राव वाढ करू शकतो. त्यामुळेच रक्तस्त्राव मोजणे आणखी अवघड होते, पण ते नक्कीच शक्य आहे

तुम्ही वापरत असलेली स्वच्छता उत्पादने तुम्हाला तुमच्या एकूण प्रवाहाचा अंदाज घेण्यास मदत करू शकतात. आणि जर तुम्हाला शुद्ध रक्त कमी होण्याचा अचूक हिशोब हवा असेल तर गणिताची मदत घेऊ शकता.

तुम्ही जर मेन्सट्रल कप वापरत असाल

मेन्सट्रल कपद्वारे तुमचा रक्तस्त्राव मोजण्यासाठी सर्वात सोपे आहे. तुम्हाला रक्तस्त्राव शोषून घेणाऱ्या येणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागत नाही. काही कपांवर व्हॉल्युम मार्किंग केलेले असते त्याद्वारे तुम्ही सहज रक्तस्त्राव मोजू शकतो.

तुम्ही कोणत्या ब्रँड आणि प्रकारचे कप वापरत यावर अवलूंबन असते की तुमचा मेनस्ट्रल कप कधीही, कुठेही साधारण ३० ते ६० मिलीलीटर रक्तस्त्राव साठवु शकतो. तुमच्या कपवर व्हॉल्युम मार्किंग नसेल तर तुम्ही उत्पादन कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन माहिती मिळवू शकता.

जेव्हा हा कर रिकाम कराण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकवेळ त्यामध्ये किती द्रव्यपदार्थ आहे याची नोंद ठेवा. तुम्ही हे तुमच्या फोनमधील नोटमध्ये किंवा वेगळी नोंदवहीत सर्व नोंद ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही नेहमीप्रमाणे कम रिकामा करून, धूवून पुन्हा वापरू शकता.

तुमच्या पुढीस ४-४ मासिक पाळी दरम्यानही तुमची नोंदवही नियमित अपडेट करत करा. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान तुमचा दिवसाला, आठवड्याला सरासरी रक्तस्त्राव होतो हे समजेल.

तुमचा एकूण रक्तस्त्राव ६० मिलीलीटर पेक्षा जास्त असल्याचेही तुम्हाला आढळून येईल पण त्यामध्ये उती (Tissue), श्लेमा (mucus), गर्भशयाचा पातळ पडदा( uterine lining ) यांचाही समावेश तुमच्या द्रवस्त्रावमध्ये असतो.

तुम्ही जर टॅम्पॉन, पॅड्स किंवा पिरिअड अंडरविअर वापरत असाल तर

तुम्ही जर स्त्राव शोषून घेणारे उत्पादन जसे की टॅम्पॉन, पॅड्स किंवा पिरिअड अंडरविअर वापरत असाल तर किती रक्तस्त्राव होतो हे शोधणे हे अवघड आहे पण शक्य आहे.

सर्वात आधी तुम्ही जे उत्पादन वापरत आहात त्याची शोषून घेण्याची क्षमता किती आहे लक्षात घेतली पाहिजे. उदा. साधारण टॅम्पॉन हे ५ मिलीलीटर द्रव शोषून घेऊ शकते तर सूपर टॅम्पून्स त्याच्या दुप्पट द्रव शोषून घेऊ शकते

तुम्हाला जर पाळी दरम्यान ६० मिलीलीटर रक्तस्त्राव होत असेल तर तुम्हाला तुमच्या साईजनुसार ६ ते १२ टॅम्पून्स वापरावे लागू शकतात. तुम्ही जर त्यापेक्षा निम्मा स्त्राव असेल तर तुम्हाला कमी टॅम्पून्स वापरावे लागतील.

तुम्हाला किती रक्तस्त्राव होतो हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही त्याची नोंद ठेवली पाहिजे.

  • तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी नोट केल्या पाहिजे?

  • तुम्ही कोणते उत्पादन वापरत आहात आणि कोणत्या साईजमध्ये वापरत?

  • तुम्हाला कितीवेळ चेंज करण्याची गरज पडते?

  • तुम्ही ज्यावेळी चेंज करता तेव्हा ते कितपत भरलेले आहे?

पुढील तीन पाळीदरम्यान या नोंदी ठेवल्यास तुम्हाला रक्तस्त्राव होतो हे जाणून घेण्यासाठी पुरेशी माहिती मिळेल.

तुम्ही द्रव्य जर शोषून घेणारे उत्पादन वापरण पूर्णपणे टाळले तर नक्कीच तुम्हाला मदत होईल. टॅम्पॉन किंवा इतर उत्पादने मर्यादेपेक्षा जास्त वापर केल्यास लिकेज( गळती होणे) किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात. सर्वासाधारणपण दर ४ तासाने टॅम्पॉन, पॅड किंवा पिरिअड अंडरविअर बदलण्याची आवश्यकता असते.

जर तुम्हाला वास्तविक रक्त हा घटकाची गणना करायची असेल तर प्रथम, मासिक पाळीचा एक अतिशय महत्त्वाचा घटक समजून घेणे महत्त्वाचे आहे: आपण केवळ रक्त गमावत नाही.

एका संशोधनानुसार मासिका पाळी दरम्यान होणाऱ्या स्त्रावादरम्यान, ३६ टक्के रक्क असे तर ६४ टक्के इतर घटक असतात जसे की, उती, गर्भाशयातील अस्तर(पातळ पडदा), श्लेमा, रक्चाच्या गुठळ्या.

हे लक्षात घेऊन, तुम्ही गमावलेल्या रक्ताचे अंदाजे प्रमाण निश्चित करण्यासाठी तुम्ही तुमचे एकूण गमावेल्या स्त्रावाच्या प्रमाणाला 0.36 ने गुणाकार करू शकता. तुमच्या एकुण स्त्रावपैकी हा आकडा वजा केल्यास तुम्हाला इतर घटकांची आकडेवारी मिळेल.

अतिरक्तस्त्राव कसा ठरविता येतो? When is bleeding considered heavy?

काही मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की जेव्हा तुम्ही 60 मिलीलीटर रक्त गमावता तेव्हा अति असतो; तर काहींनी हे प्रमाण जास्त , 80 मिलीलीटरच्या जवळ सांगितली आहे.

जास्त रक्तस्त्राव, किंवा मेनोरेजिया, नेहमीच चिंतेचे कारण नसते. जोपर्यंत ते तुमच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणत नाही किंवा तुम्हाला इतर लक्षणे जाणवत नाहीत तोपर्यंत उपचार करणे आवश्यक नसते.

डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?

काही तासांपेक्षा जास्त काळात, दर तासाला तुम्हाल एकापेक्षा जास्त टॅम्पॉन, पॅड किंवा कप्स वापरावे लागत असतील तर.....

टॅम्पॉन, पॅड लिक होऊ नये यासाठी डबल प्रॉटेक्शनची गरज पडते तेव्हा

सात दिवासांपेक्षा जास्त रक्तस्त्राव होत असेल तर

स्त्रावामध्ये एक चतुर्थांश पेक्षा मोठ्या रक्ताच्या गुठळ्या असतील तर...

तुमच्या दैनदिन कामामध्ये पाळीमुळे अडथळा येत असेल तर

थकवा, श्वास लागणे किंवा अशक्तपणाची इतर लक्षणे जाणवत असतील तर...

जास्त रक्तस्त्राव कशामुळे होतो?

जर तुमचा मासिक पाळीचा प्रवाह सतत जास्त असेल, तर ते अंतर्निहित स्थितीचे लक्षण असू शकते किंवा तुम्ही घेत असलेल्या औषधाचा परिणाम असू शकतो. तुम्हाला सामान्यत: जास्त रक्तस्त्राव व्यतिरिक्त इतर लक्षणे जाणवतील. कोणती लक्षणे जाणवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT