Women Self-Confidence tips in Marathi Esakal
वुमेन्स-कॉर्नर

Women Self-Confidence: या टीप्सच्या मदतीने वाढेल महिलांचा आत्मविश्वास

Women Self-Confidence tips: महिलांनी आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. तुमचा आत्मविश्वास चांगला असेल तर तुमच्या प्रत्येक वाक्याचा, निर्णयाचा आणि कामाचा आदर केला जाईल आणि तुमच्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन बदलेल

सकाळ डिजिटल टीम

Women Self-Confidence Tips: सध्याच्या युगात महिला या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. असं कोणतचं क्षेत्र नाही जिथं महिलांचा वावर पाहिला मिळतं नाही. खरं प्रत्येक स्त्री ही मल्टी टास्कर multi tasking असते. एकाचवेळी ती अनेक काम आणि जबाबदाऱ्या सांभाळत असते.

नोकरी करणारी महिला असो वा गृहिणी त्या नोकरी, घर, मुलं आणि एकूणच कुटुंब या सर्वांची जबाबदारी अगदी उत्तमपणे सांभाळत असते. प्रत्येक स्त्री ही शक्तीशाली असते मात्र असं असूनही अनेक महिलांमध्ये आत्मविश्वासाची Self Confidence कमतरता असल्याने त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. personality development tips for females how to increase self confidence

प्रत्येक जबाबदारी हाताळण्याची क्षमता असूनही किंवा एखादं काम करण्याची इच्छा असूनही अनेक महिला Womenआत्मविश्वास कमी असल्याने एखादं महत्वाचं पाऊल उचलण्यासाठी किंवा एखादा निर्णय घेण्यासाठी घाबरतात. काही महिला त्यांच्या बोलण्याला किंवा निर्यणाला महत्व दिलं जातं नाही अशी तक्रार करतात.

यासाठी महिलांनी आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. तुमचा आत्मविश्वास चांगला असेल तर तुमच्या प्रत्येक वाक्याचा, निर्णयाचा आणि कामाचा आदर केला जाईल आणि तुमच्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन बदलेल. हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी काय करावं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोतं. 

Self care स्वत:ची काळजी घेणं गरजेचं- काम, घर, कुटुंब आणि सगळ्याच जबाबदाऱ्या सांभाळताना महिला स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ काढणं विसरतात. त्यामुळे सर्वप्रथम स्वत:ची काळजी घ्या. शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक आणि नैतिक पातळीवर आजपासूनच स्वत:ची काळजी घेण्यास सुरूवात करा.

स्वत:साठी वेळ काढा मग तो विश्रांतीसाठी असेल किवा नवं काही शिकण्यासाठी, व्यायामासाठी, स्किन, हेअर केअर या सगळ्यांसाठीच. एक लक्षात घ्या सेल्फिश आणि सेल्फ केअर यात मोठा फरक आहे. 

कंफर्ट झोनमधून बाहेर या- कंफर्ट झोनमधून Comfort Zone बाहेर येण्याचा प्रयत्न करा आणि नव्या आव्हानांसाठी प्रयत्नशील रहा. नवं काही शिकण्यासाठी तुम्ही पाऊल उचलतं आणि नवं काही शिकलात तर तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल.

संवाद कौशल्यावर लक्ष द्या- दबक्या आवाजात न बोलता तुमचे विचार स्पष्ट आणि न अडखळता मांडा. लोकांशी संवाद साधताना बॉडी लॅगवेज आणि शब्दांकडे लक्ष द्या. तुमचं संवाद कौशल्य चांगसं असेल तर तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढतो. Communication skills for self-confidence. 

हे देखिल वाचा-

स्वत:वर विश्वास ठेवा- स्वत:वर विश्वास ठेवाल तर आपसूकच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. इतर काय विचार करतील यापेक्षा तुम्हाला काय वाटतं आणि तुमचा स्वत:वर विश्वास असणं अधिक गरजेचं आहे. जर तुमचा स्वत:वर विश्वास असेल तर तुम्ही तुमचं मत मांडताना गोंधळणार नाहीत.

चुका होण्याची भिती सोडा-  चुक ही प्रत्येकाकडून होते. त्यामुळे चुकांना घाबरू नका. तसचं जुन्या चुकांमुळे घाबरण्यापेक्षा किंवा त्याची लाज वाटून घेण्यापेक्षा त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. किंबहूना त्या विसरून पुढे जा. स्ट्रेस घेण्यापेक्षा आनंदी राहण्याचा प्रयत्न कराल तर अधिक आत्मविश्वास दिसेल. 

परिणामांची चिंता न करता निर्णय घ्या- कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा कामापूर्वी परिणामांची चिंता करू नका. याउलट परिणाम काही असो तो सांभाळण्यासाठी मी सक्षम आहे असं म्हणून निर्णय घ्या. यामुळे तुमचा आत्मविश्वास मजबूत असल्याचं दिसून येतं. निर्णय घेताना मनात संभ्रम नसेल आणि परिणामांची चिंता नसेल तर तुम्हाला कोणच्याही कामात यश मिळत. याने आत्मविश्वास आणखी वाढतो. 

ड्रेसिंग सेन्स-  तुमचा पेहराव हा तुमचा कॉन्फिड्नस वाढवण्यासाठी महत्वाचा घटक आहेत. जर तुम्ही चांगले, तुम्हाला कम्फर्टेबल वाटतील असे कपडे परिधान केलेत तर ते तुमचा आत्मविश्वास Self Confidence वाढण्यासाठी बुस्टर ठरू शकतं. 

याशिवाय इतर काही छोट्या गोष्टींकडेही तुम्ही लक्ष दिलंत तर तुमचा आत्मविश्वास वाढेल. यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनातील भिती काढून टाकणं. कोणतिही भिती न बाळगता आपलं मत मांडा. एखाद्या गोष्टीची भिती असले तर तिचा सामना करा यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल.

तसचं इतरांना कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे काही वेळेला गोंधळ होवू शकतो. त्यापेक्षा स्वत:तील गुण शोधा आणि तुम्ही जसे आहात तसे रहा यामुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होईल.

इतरांना कॉपी करून फसगत होण्यापेक्षा तुम्ही जसे आहात तसे राहिलात तर तुमचा आत्मविश्वास दिसून येतो. तुमचा आत्मविश्वास चांगला असेल तर कोणत्याही कामात तुम्हाला यश हे नक्की मिळेल. कारण आत्मविश्वास हीच यशाची खरी गुरूकिल्ली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

ISRO: 'इस्रो'कडून होतेय ४० मजली उंचीच्या यानाची निर्मिती; अध्यक्ष व्ही. नारायण यांनी दिली सखोल माहिती

Georai Crime : 'त्या' मायलेकीच्या मृत्यूचे कारण आले समोर; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पतीला अटक

Maharashtra Heavy Rain Update : मुसळधार पावसाचा फटका! जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शाळा- कॉलेज बंद, पण कुठे?

Mumbai Rain Update: मुंबईकरांनो सतर्क राहा! पावसाचा जोर वाढणार, आयएमडीचा अंदाज

SCROLL FOR NEXT