womens corner sakal
वुमेन्स-कॉर्नर

स्त्री मनाची अवस्था

स्त्री मुक्त झाली म्हणायचे ॽ की स्त्री बंधनातच आहे म्हणायचे ॽ

सकाळ वृत्तसेवा

स्त्री मुक्त झाली म्हणायचे ॽ की स्त्री बंधनातच आहे म्हणायचे ॽ काही म्हणा, पण एक माणूस म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून तिचं अस्तित्व मान्य करायलाच हवं. तिला भरारी घेता यायलाच हवी. स्वतः च्या अपेक्षांचे, स्वप्नांचे पंख पसरवून. कारण पुरातनकाळापासून त्याग सहनशीलता, समर्पण कितीतरी उदाहरणं तिनं समाजासमोर ठेवली आहेत.

वस्तुस्थिती वेगळीच असते स्त्रियांच्या जीवनाची. रूढी, परंपरा अंधश्रद्धा, अशिक्षितता या अंधारातून निघालेला महिलेचा प्रवास नक्कीच खडतर रस्त्यावरूनच झालेला आहे आणि आताही तो तसाच आहे. तरी पण रत्नाच्या तेजाने सर्वांचे डोळे दिपावे असे स्त्रियांचे कर्तृत्व आहे.

काटेरी अंथरुणावर जन्माला येऊन त्या अंथरूणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात, पण बोचणाऱ्या काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि हक्क मिळवण्यासाठी ज्यांच्यात हिम्मत असते ते असामान्य होतात, आणि हेच स्त्री ने करून दाखवले आहे. तरी पण हे मुठभर स्त्रियांनीच. आजही किती टक्के घरात तिच्या मताला पा़धान्य आहे. परिस्थिती कितीही वाईट असुद्या आत्महत्येचा विचार कधीही तिच्या मनात येत नाही. तिला मारलेच जास्त जाते. मला पुरुष संस्कृतीला दोष द्यायचा नाही. सगळेच पुरुष किंवा सगळ्याच स्त्री या वाईट नसतात. पण हा, काही अंशी स्त्री याच स्त्री यांच्या दुश्मन असतात. त्यांच्यात जेलसीचा भाव असतो. सासूला वाटते मी त्रास भोगला, मग सुनेला मी का छळू नये, ही भावना.

पण या बाबतीत मी खूप नशीबवान आहे. माझ्या सासूबाई आधुनिक विचारांच्या होत्या. नेहमी मार्गदर्शन करायच्या. आईपेक्षाही माया होती. त्या एक उदाहरण नेहमी द्यायच्या. बाई नवरा उशाखालचा नाग असतो, कधी फणा काढेल याचा नेम नाही, म्हणून हुशारीने वागत जा. त्यांना हेच सांगायचे असायचे की तुम्ही कुठेही कमी पडू नका.

हिरव्याकंच बिल्लूरात अन् टीचभर कुंकवात तिचं अस्तित्व नाही, त्याही पलीकडे तिचं जग आहे. इतिहासाची साक्ष आहे जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्याबाई अशी अनेक नावे आहेत कर्तृत्ववान स्त्रियांची. कितीही निर्बंध लादले तरी ती आता डगमगणार नाही एवढे नक्कीच. प्रत्येक स्त्री ने जिजाऊ बाणा जपल्यास असाध्य ते साध्य सहज शक्य आहे. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते

युगंधरा मी नव्या युगाची

मानवतेचा ध्वज करी धरूनी

उंच स्वराने स्वतंत्र तेचि

गाइन उज्ज्वल, मंगल गाणी

हवे मला प्रिय गृहमंदीर मम

नको परी ती बंदीशाला

प्रेमळ पती मम देव खरोखर

नव्हे परी तो राखनवाला

भारतीय संविधानाने स्त्रियांना खरे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचा फायदाही त्यांना पुरेपूर होतो आहे. आता तरी स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे फुलू द्यावे, तिचे पंख छाटण्याचा प्रयत्न करू नये. तरच तिचा मन मयुरा फुलेल आणि तिचे हास्य सदा खुलत राहील.

- मंदाकिनी काकडे, सुर्वे नगर, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT