womens day Mauritania fat women information marathi 
वुमेन्स-कॉर्नर

Women`s Day: 'या' देशातल्या महिला आहेत सगळ्यात जास्त जाड; कारण वाचून धक्का बसेल

रविराज गायकवाड

आपल्याकडं किंवा अगदी पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा, वजन वाढलं की महिलांची चिंता वाढते. आपलं वजन कायम नियंत्रणात असावं, असं प्रत्येक महिलेला वाटतं. पण, जगाच्या पाठीवर एक असा देश आहे की जिथल्या महिलाचं सरासरी वजन हे इतर कोणत्याही देशातल्या महिलांच्या वजनापेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे त्यामागचं कारणही गमतीशीर आहे.

महिलांविषयीचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुष्काळ पाचवीला पुजलेला
पूर्व अफ्रिकेत मौरिटेनिया नावाचा एक देश आहे, सहारा वाळवंटाचा काही भाग या देशात येतो. पश्चिमेला अंटार्टिका महासागर आहे. तर दक्षिणेला सेनेगल नावाचा आणखी एक गरीब देश आहे. मौरिटेनिया हादेखील एक गरीब देशच आहे. देशात अन्न धान्याचा तुटवडा आहे. रोजगाराची साधनं नाहीत. शेती, मर्यादत आणि त्यासाठी पाण्याची मारामार. अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ जणू पाचवीला पुजलेलाच. अशी सगळी पार्श्वभूमी असतानाही, मौरिटेनियामधील महिला या जगातील सर्वांत जास्त जाड, धष्टपुष्ट आहेत. देशातील 50 टक्के महिला या ओवर वेट (प्रमाणापेक्षा जास्त वजन असलेल्या) आहेत. तर 20 टक्के महिला लठ्ठ आहेत.

महिलांविषयीचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सौंदर्याचं प्रतीक लठ्ठपणा
लठ्ठपणा हा स्त्री सौंदर्याचं प्रतीक मानणारा मौरिटेनिया हा जगातील एकमेव देश आहे. त्यामुळं लहानपणापासूनच मुलींना तिच्या भुकेपेक्षा जास्त भरवलं जातं. जर एखादी महिला जाट नसेल तर, तिला दरिद्री समजलं जातं. म्हणजे, तिच्या घरात खायला प्यायला नाही, असा समज केला जातो. त्यामुळं लहानपणापासूनच मुलीची अंगकाठी सुदृढ असेल, यासाठी तिची आई प्रयत्न करत असते. मुलीच्या आईलाही तिच्या आईनं असंच वाढवलेलं असतं. त्यामुळं जणू एखाद्या अनुवंशिक रोगा प्रमाणं, प्रत्येक आई आपल्या मुलीला लठ्ठपणा देते. मुलगी बारीक राहिली तर, तिच्यासोबत लग्न कोण करणार, अशी चिंता प्रत्येक आईला असते. त्यामुळं घरात मुलगा-मुलगी असेल तर, मुलाला कमी आणि मुलीला जास्त खायला दिलं जातं. तिला रोज दूध दिलं जातं. तिच्या पोटालाच भुकेची इतकी सवय लावली जाते की, मोठी झाल्यानंतरही तिचा आहार वाढतच राहतो. ओव्हर फिडिंग अर्थात अति खाण्यानं मुली लहानपणापासूनच जाड दिसायला लागतात. देशात जाड मुलगीचं लग्न पटकन होतं.

महिलांविषयीचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बिग इज ब्युटिफूल
महिला जाड असण्यामागं मौरिटेनियामधली पुरुषी मानसिकताही जबाबदार आहेत. देशातील तरुण, किंवा वयस्कर कोणत्याही व्यक्तीला महिलेच्या सौंदर्याची व्याख्या विचारली तर, तो बिग इज ब्युटिफूल, असंच उत्तर देतो. पुरुषांची ही मानसिकता असल्यामुळं मुली स्वतः जाड करतात. हा एक वेगळ्या प्रकारचा महिला अत्याचाराच प्रकार आहे. लग्नाच्या वेळी मुलाने पटकन पसंती द्यावी, यासाठी मुलींच्या आई मुलींच्या पोटावर लहानपणापासून अत्याचार करत असतात. मुलीनं खाण्यास नकार तिला तर तिला जबरदस्तीनं खाऊ घातलं जातं. विशेषतः मुलींना भरपूर दूध दिलं जातं. एकाबाजूनं विचार केला तर, लग्न व्हावं, मुलाला आपण आवडावं, यासाठी महिला स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत.
International Womens Day

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Ban: तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT