स्मिता सभरवाल Esakal
युथ्स-कॉर्नर

Success Story अवघ्या २३व्या वर्षी IAS अधिकारी बनल्या स्मिता सभरवाल, १०वी आणि १२वीत भारतात टॉपर

स्मिता सभरवाल यांनी अगदी कमी वयामध्ये देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या परिक्षांपैकी एक UPSCच्या परिक्षेत देशात चौथा क्रमांक पटकावला. त्यांची ही सक्सेस स्टोरी

Kirti Wadkar

IAS ऑफिसर होण्याचं अनेकांचं स्वप्न असते. हे स्वप्न साध्य करण्यासाठी अनेक तरुण तरुणी मोठी मेहनत करतात. UPSCची परिक्षा पास होण्यासाठी दिवसातील १४-१५ तास अभ्यास केल्यानंतरही अनेकांना यश येत नाही. यामुळे काहीजण वेगळं करियर निवडण्याचा प्रयत्न करतात. Success Story of Smita Sabharwal Darjiling women now IAS in Telangana

तर अनेकजण पहिल्या प्रयत्नात आलेल्या अपयशातून धडा घेत अधिक जीवतोड मेहनत घेतात. UPSC च्या पहिल्याच परिक्षेत खूप कमी जणांना यश येत. यातील अनेकजण अपयशाच्या या पहिल्या पायरीवरून माघार घेत असले तरी अनेकजण आपल्यातील उणिवा शोधून अधिक मेहनत घेतात आणि पुढच्या प्रयत्नात यश मिळवतात. यापैकीच एक म्हणजे IAS अधिकारी स्मिता सभरवाल.

स्मिता सभरवाल यांनी अगदी कमी वयामध्ये देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या परिक्षांपैकी एक UPSCच्या परिक्षेत देशात चौथा क्रमांक पटकावला. खरं तर स्मिता यांना देखील UPSCच्या पहिल्या परिक्षेत अपयश आलं होतं. एवढचं काय तर UPSCची प्रिलिम देखील त्या पास करू शकल्या नव्हत्या.

२३व्या वर्षी मिळवलं यश

मात्र जिद्दीने स्मिता यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला. लहानपणापासूनच त्यांना लोकांसाठी, त्यांची मदत करण्यासाठी काम करण्याची इच्छा होती. याच जिद्दीने त्यांनी एवढी मेहनत घेतली की UPSCच्या परिक्षेत त्या देशात चौथ्या आल्या. २००० सालामध्ये स्मिता सभरवाल यांनी UPSCची परिक्षा पास केली. यावेळी त्या केवळ २३ वर्षांच्या होत्या.

लहानपणापासूनच अभ्यासात हुशार

मुळच्या दार्जिलिंगच्या असलेल्या स्मिता यांनी हैदराबादमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. लहानपणापासूनच त्या अभ्यासामध्ये हुशार होत्या. १० वी च्या परिक्षेमध्ये स्मिता ऑल इंडिया बोर्ड टॉपर होत्या. तर १२वीच्या परिक्षेतही त्यांनी भारतातून पहिला क्रमांक पटकावला होता. बारावीनंतर स्मिता यांनी सेंट फ्रांसिस डिग्री कॉलेज फॉर वूमनमधून पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.

UPSCच्या तयारीसाठी स्मिता या दररोज ६ तास अभ्यास करत. तर अभ्यासाचा ताण कमी व्हावा यासाठी त्या काहीवेळ इतर अॅक्टिविटीमध्ये सहभागी होत.

पिपल्स ऑफिसर

स्मिता सभरवाल सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. यामुळेच UPSCची तयारी करणारे अनेकजण त्यांना फॉलो करतात. स्मिता या तेलंगणा मुख्यंमंत्री कार्यालयातून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या तेलंगणामध्ये सचिव पदावर नियुक्त कार्यरत आहेत. तसंच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि मिशन भगीरथ या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.

ग्रामिण पातळीवर त्या विविध योजना राबवत असतात. म्हणूनच स्मिता यांना पिपल्स ऑफिसर म्हणूनही ओळखलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT