Sumeet Raghavan Chinmayee Sumeet  
युथ्स-कॉर्नर

लग्नाची गोष्ट : एकमेकांसाठी ‘येडीपिसी’ जोडी!

सुमीत राघवन

अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत या पती-पत्नीच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. ते एकमेकांबद्दल नेहमीच भरभरून बोलताना दिसतात. पुढच्याच वर्षी त्यांच्या सुखी संसाराला २५ वर्षं पूर्ण होतील. चिन्मयी सुमीत सध्या कलर्स मराठीच्या ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत आत्याबाई ही भूमिका साकारत आहेत. त्या सध्या या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत, तर अभिनेता सुमीत राघवन ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलर्स मराठीच्या परिवारात सामील झाले आहेत.

चिन्मयी सुमीत या सुमीतविषयी बोलताना म्हणाल्या, ‘‘सुमीत अत्यंत मनमिळाऊ, शिस्तप्रिय आहे. यासोबतच तो इतरांच्या मतांचा आदर करणारा आहे. कारण त्याची आणि माझी विचारसरणी बऱ्याच गोष्टींमध्ये वेगळी आहे. त्यामुळं आम्ही नेहमीच एकमेकांच्या मतांचा, आमच्या मुलांच्या मतांचा आणि इतरांच्या मतांचा आदर करत आलो आहोत. सुमीत हा उत्कृष्ट अभिनेता आहेच; सोबत तो उत्तम गातो. मी त्याला एखाद्या गाण्याची फर्माईश केल्यावर  तो माझ्यासाठी गातो. अतिशय लाघवी असं व्यक्तिमत्व आहे सुमीतचं.’’ सुमीतच्या कलर्स मराठीच्या परिवारात येण्यानं चिन्मयीही खूष आहेत. गेल्या वर्षीच्या कलर्स मराठीच्या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन या दोघांनी एकत्र मिळून केलं होतं. 

सुमीत चिन्मयीबद्दल म्हणतो, ‘‘चिन्मयी खूप मनस्वी आहे. तिला फार काळ समोरच्यावर रागावता येत नाही; तिचा राग पटकन निवळतो. ती एखाद्या व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवते. ती समोरच्यावर कोणतीही बंधनं न आणता, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन मनापासून प्रेम करते. तिच्यातला हा गुण मला फार आवडतो आणि मला तो आत्मसात करायला नक्कीच आवडेल. यासोबत तिचं वाचन जबरदस्त आहे, तिला अनेक कामं एका वेळी करता येतात. आत्ता सांगलीला शूटिंग सुरू असलं तरी कुठल्याही स्त्रीप्रमाणं तिचाही दुसरा डोळा हा आपल्या घराकडं असतो. ती मालिकेत साकारत असलेल्या आत्याबाईंच्या भूमिकेच्या अगदी विरुद्ध ती खऱ्या आयुष्यात आहे.’’ 

सुमीतनं ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी छोट्या पडद्यावर नुकतंच पदार्पण केलं आहे. ‘‘आशिष पाथरेनं मला कार्यक्रमाची संकल्पना ऐकवली आणि मला ती फार आवडली. याआधी मी काही पुरस्कार सोहळे वगळता मराठी टेलिव्हिजनवर तसं विशेष काम मी केलेलं नाही. या कार्यक्रमात माझी भूमिका फार वेगळी आहे. माझ्यासमोर काम करणारे सगळेच दिग्गज कलाकार आहेत आणि मला त्यात कोणालाही जज करायचं नाही, ही गोष्ट मला विशेष आवडली. ही सगळी मंडळी चिन्मयीच्या माहेरची माणसं आहेत आणि मी जावई म्हणून या परिवारात आलो आहे. या कार्यक्रमात मी गातोय, काही किस्से सांगतोय, या सगळ्यांबरोबर धमाल करतोय. मला या सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा येतेय. आपल्या सगळ्यांचं गेलं संपूर्ण वर्ष तणावपूर्ण गेलं आहे. त्यामुळं या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत त्यांचा ताण कमी करण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न आहे,’’ असं सुमीतनं सांगितलं.
(शब्दांकन - राजसी वैद्य)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT