
जम्मूला जाणाऱ्या Air Indiaच्या विमानाला चक्क उंदरांमुळे दोन तास उशीर
कधी खराब हवामानामुळे तर कधी तांत्रिक कारणाने अनेकदा फ्लाइटला उशीर होतो. मात्र उंदरांमुळे फ्लाइटला उशीर झाल्यातचे तुम्ही कधी ऐकले का? पण असं घडलय. श्रीनगरहून जम्मूला (Srinagar Jammu Flight) जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला (Air India) उंदरांमुळे दोन तास उशीर झाला. दोन तासांच्या प्रयत्नानंतर उंदराला पकडण्यात आले. यानंतर विमानाला उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली. (Air India flight was delayed by two hour as a rat was found in the plane )
हेही वाचा: एकतर्फी प्रेमातून मामीची हत्या; खुनी भाचा अन् त्याच्या मित्राला जन्मठेप
प्रकरण असे आहे की श्रीनगरहून जम्मूला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाला उंदीर दिसला. यानंतर एकच खळबळ उडाली आणि विमानसेवा तात्काळ बंद करण्यात आली. दोन तासांनंतर उंदराला पकडण्यातनंतर विमानसेवा पुर्ववत करण्यात आली.
उंदीर फ्लाइटपर्यंत येणे शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानतळ व्यवस्थापनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Web Title: Air India Flight Was Delayed By Two Hour As A Rat Was Found In The Plane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..