Rohit Sharma Record | New Zealand vs India 2nd ODI

 

Sakal

Cricket

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Rohit Sharma Breaks Afridi's Record for Most ODI Sixes vs NZ: भारताने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवला आहे. या सामन्यात रोहित शर्माने दोन षटकार मारले. त्यामुळे शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला आहे.

Pranali Kodre

New Zealand vs India 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड संघात दुसरा वनडे सामना शनिवारी (७ नोव्हेंबर) वेलिंग्टनला पार पडला. या सामन्यात बराचवेळ पावसाचा व्यत्यय आल्याने भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार ४ धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) छोटेखानी खेळी केली असली, तरी मोठा विक्रम केला आहे. त्याने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला (Shahid Afridi) मागे टाकले आहे.

सामन्यापूर्वीच पाऊस झाल्याने षटके कमी करून ४७-४७ षटकांचा सामना करण्यात आला होता. पण भारतीय गोलंदाजांच्या शानदार माऱ्यासमोर न्यूझीलंडचा संघ ४१ षटकात १३४ धावांवरच सर्वबाद झाला. त्यानंतर भारतासमोर १३५ धावांचे लक्ष्य होते.

पण भारताने शुभमन गिलची विकेट दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर गमावली. गिलला भोपळाही फोडता आला नाही. काहीवेळात विराट कोहली देखील चौथ्या षटकात ७ धावा करून बाद झाला. पण तरी सलामीवीर रोहित शर्मा एका बाजूने खेळत होता, त्याला श्रेयस अय्यर साथ देत होता.

रोहितने काही चांगले शॉट्सही खेळले. त्याने दोन षटकार आणि दोन चौकारही मारले होते. परंतु, त्याला ९ व्या षटकात काईल जेमिसनने बाद केले. रोहितचा हेन्री निकोल्सने स्लीपमध्ये चांगला झेल घेतला. रोहित २८ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. पण यादरम्यान, त्याने न्यूझीलंडविरुद्ध वनडेत ५० षटकारांचा टप्पा पार केला.

रोहितचे आता न्यूझीलंडविरुद्ध वनडेत ३६ सामन्यांत ५१ षटकार झाले आहेत. त्यामुळे त्याने न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक वनडे षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शाहिद आफ्रिदीला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला. आफ्रिदीने न्यूझीलंडविरुद्ध वनडेत ३८ सामन्यांत ५० षटकार मारले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये ५० षटकारांचा टप्पा केवळ रोहित शर्मा आणि शाहिद आफ्रीदीने पार केला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक वनडे षटकार

  • ५१ षटकार - रोहित शर्मा (३६ सामने)

  • ५० षटकार - शाहिद आफ्रिदी (३८ सामने)

  • ४५ षटकार - ख्रिस गेल (३० सामने)

  • ४१ षटकार - सनथ जयसूर्या (४७ सामने)

  • २९ षटकार - जॉस बटलर (२८ सामने)

  • २९ षटकार - विराट कोहली (३८ सामने)

भारताचा विजय

दरम्यान रोहित बाद झाल्यानंतर अक्षर पटेलही ७ धावांवर बाद झाला होता. परंतु, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी डाव सावरला. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या, मात्र श्रेयस ३० धावांवर बाद झाला.पाठोपाठ नमन धीर १२ धावांवर आणि अंशुल कंबोज १ धावेवर बाद झाल्याने भारतीय संघ संकटात सापडला होता.

परंतु, भारताच्या २६ षटकात ७ बाद ११३ धावा झालेल्या असताना पावसाला पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे अखेर खेळ थांबवण्यात आला आणि डकवर्थ लुईस नुसार भारत ४ धावांनी पुढे असल्याने त्यांना विजेता घोषित करण्यात आले. केएल राहुल २६ धावांवर नाबाद राहिला. आकिब नबी १ धावेवर नाबाद राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Diwali Bank Holiday: दिवाळीच्या आठवड्यात महाराष्ट्रातील बँकाना तब्बल 3 दिवस सुट्टी! कोणत्या दिवशी बँका बंद राहणार? आत्ताच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT