Nana Patekar Last Wish

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Nana Patekar Last Wish : नाना पाटेकरांची अंतिम इच्छा चर्चेत 'या' लाकडात जाळू नका; "लोकांना वाटेल माझ्यासाठी रडत आहेत"

Nana Patekar Death Wish : नाना पाटेकरांची अंतिम इच्छा सध्या चर्चेत आहे. ‘या’ लाकडात मला जाळू नका, असं त्यांनी का म्हटलं होतं? जाणून घ्या त्यामागचं कारण.

Sandeep Shirguppe

Nana Patekar Last Statement : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. गुरुवारी पहाटे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांना वाचवता आले नाही.

नाना पाटेकर हे आपल्या परखड स्वभावासाठी आणि दमदार अभिनयासाठी ओळखले जात. ते कमी बोलायचे; मात्र जे बोलायचे ते ठामपणे बोलायचे. मृत्यूबाबतही त्यांनी काही वर्षांपूर्वी अत्यंत स्पष्टपणे आपली इच्छा व्यक्त केली होती. २०२३ मध्ये ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी आपल्या अंत्यसंस्काराबाबत भाष्य केले होते.

‘१२ मन लाकडे ठेवली आहेत...’

नाना पाटेकर यांनी सांगितले होते की, मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी लागणारी १२ मन लाकडे त्यांनी आधीच ठेवली आहेत. ‘हीच माझी अंतिम संपत्ती आहे,’ अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. ही लाकडे कोरडी असून त्याच लाकडांचा अंत्यसंस्कारासाठी वापर करावा, अशी त्यांची इच्छा होती.

‘ओल्या लाकडाचा वापर करू नका’

‘मला ओल्या लाकडात जाळू नका. ओल्या लाकडामुळे धूर होईल. तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळ्यांत पाणी येईल आणि मग ते माझ्यासाठी रडत आहेत, असा गैरसमज होईल,’ असे नाना यांनी मिश्कील शैलीत म्हटले होते. ‘माझ्यासाठी रडू नका. माझ्या फोटोला हारही घालू नका,’ अशी त्यांची भावना होती.

‘मृत्यूची भीती नाही’

नाना पाटेकर यांनी मृत्यूबाबतही आपली भूमिका स्पष्ट ठेवली होती. आई-वडील, भाऊ आणि बहिणी यांचे निधन झाल्याचे सांगताना आपण आता एकटे उरलो असल्याचे त्यांनी म्हटले होते. मृत्यू आपल्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तींकडे घेऊन जाईल, असा त्यांचा दृष्टिकोन होता.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांचे हे जुने वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. पडद्यावर गंभीर, खलनायकी, विनोदी तसेच संवेदनशील भूमिका साकारत त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी : द म्युझिकल’, ‘वेलकम’, ‘अपहरण’, ‘राजनीती’ यांसह अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

Marathi News Live Updates: सीएसएमटी स्थानकावर छताचा भाग कोसळून मोठी दुर्घटना, दोन प्रवासी जखमी

Nagpur Election: पदवीधर आज निवडणार आपला प्रतिनिधी; आज मतदान; २.५५ लाख ६०३ मतदार, एकूण ४४५ मतदान केंद्र

Solapur Rabi Sowing: साेलापूर जिल्ह्यात रब्बी पेरणी केवळ १४ हजार हेक्टरवर; गतवर्षी ऑक्टोबरअखेर १४ टक्के; यंदा केवळ ४.४२ टक्के

Asian Para Games 2026: हॅनी, संदीप यांचा विश्वविक्रम! भारताच्या खात्यात आज ५ सुवर्ण... पदकांचे शतक पूर्ण, चीन ३४५ पदकांसह अव्वल

FDA Action: एफडीएची मुंबईत धडक कारवाई! डॉमिनोज पिझ्झासह नामांकित रेस्टॉरंट्स अन् बेकरींचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT