नोकरी मिळत नाही, मग करा हा बिझनेस, मिळेल चांगली कमाई !!!

अलीकडच्या काळात देशात बेरोजगारी ही मोठी समस्या बनत चालली आहे.
earning
earning sakal

अलीकडच्या काळात देशात बेरोजगारी ही मोठी समस्या बनत चालली आहे. त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी एक बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. ज्याची खेड्यापाड्यापासून ते शहरांपर्यंत मोठी मागणी आहे. आम्ही मोबाईल, लॅपटॉप रिपेअर व्यवसायाबद्दल बोलत आहोत. दिवसेंदिवस मोबाईल-लॅपटॉपच्या गरजा वाढत आहेत. त्यामुळे या व्यवसायात बंपर कमाई करुन देण्याची क्षमता आहे.

earning
महत्त्वाची बातमी! ब्रोकरेज हाऊसनं LIC चे शेअर्स खरेदी करण्याचा दिला सल्ला

लॅपटॉप आणि मोबाईल रिपेअरिंग हे एक कौशल्य आहे. लॅपटॉप आणि मोबाईल रिपेअरिंगही ऑनलाइन शिकता येते. कोर्स केल्यानंतर काही काळ रिपेअरिंग सेंटरमध्ये काम केले तर तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. तुम्ही लॅपटॉप आणि मोबाईल रिपेअरिंगमध्ये पूर्णपणे एक्सपर्ट झालात की तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकता.

लोक सहज पोहोचू शकतील अशा ठिकाणी हे रिपेअर सेंटर सुरू करा. किंवा अशी जागा शोधा जिथे जास्त रिपेअर सेंटर नाहीत. तुम्ही या रिपेअर सेंटरचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करु शकता.

लॅपटॉप आणि मोबाईल रिपेअरिंग सेंटर उघडल्यास सुरुवातीला खूप सामान ठेवण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला फक्त काही आवश्यक हार्डवेअर तुमच्यासोबत ठेवावे लागतील. मदर बोर्ड, प्रोसेसर, रॅम, हार्ड ड्राईव्ह आणि साउंड कार्डसारख्या गोष्टी जास्त प्रमाणात ठेवण्याची गरज नाही. कारण ते सहजपणे लगेच ऑर्डर केले जाऊ शकतात.

earning
22 लाख कोटी बुडाले; बिटकॉइन 20,000 डॉलरच्या खाली

किती कमाई होईल ?
आपण एखाद्या गावात किंवा शहरात रिपेअर सेंटर उघडल्यास, चांगले पैसे कमवू शकता. दोन ते चार लाख रुपये खर्चून लॅपटॉप, मोबाईल रिपेअर सेंटर सुरू करता येते. रिपेअरिंग व्यतिरिक्त तुम्ही लॅपटॉप आणि मोबाईल सहज विकू शकता. मोबाईल आणि लॅपटॉप दुरुस्तीचे शुल्क खूप जास्त आहे. याद्वारे तुम्ही महिन्याला 50 - 50 हजार रुपये सहज कमवू शकता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com