दररोज 200 रूपये वाचवा अन् कोट्यधीश व्हा! कसं ते जाणून घ्या?

पीपीएफ (PPF), एसआयपी (SIP), डायव्हर्सिफाईड फंड्समध्ये दर महिन्याला 6000 रुपये गुंतवले तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
 investment sector
investment sector sakal

Investment Tips: भरपूर पैसे कोणाला कमवायचे नसतात? कोट्यधीश होण्याची स्वप्न कोणाला नाही पडत ? पण आता फक्त स्वप्न नका बघू, तर हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी डोकं लावा, आम्ही तुमची मदत करतो. फक्त गुंतवणुकीची तयारी सुरू करा. या गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज नाही. फक्त योग्य वेळी म्हणजेच लवकरात लवकर सुरू करणे गरजेचे आहे. समजा तुम्ही नुकतेच तुमचे करिअर सुरू केले आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

पीपीएफ (PPF), एसआयपी (SIP), डायव्हर्सिफाईड फंड्समध्ये दर महिन्याला 6000 रुपये गुंतवले तर नेमका किती परतावा मिळू शकतो ते जाणून घेऊयात.

 investment sector
गुगल लवकरच 'शेअरचॅट'मध्ये गुंतवणूक करणार, जाणून घ्या काय आहे करार

PPF मध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करा
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) सारख्या योजनांमध्ये आपले पैसे गुंतवले तर किती रिटर्न मिळेल पाहुयात. तुम्ही पीपीएफमध्ये दिवसाचे 200 रुपये म्हणजेच दरमहा 6000 रुपये गुंतवल्यास तुमची गुंतवणूक एका वर्षात 72,000 रुपये होईल. नियमितपणे गुंतवणूक केल्यास ही रक्कम 15 वर्षांच्या कालावधीत 19 लाख 52 हजार 740 रुपये होईल.

20 वर्षांपर्यंत गुंतवणूक वाढवा
तुम्ही PPF मध्ये 20 वर्ष पैसे जमा करत राहिल्यास ही रक्कम 31 लाख 95 हजार 978 लाख रुपये होईल. आता ती आणखी ५ वर्षे वाढवली तर 49 लाख 47 हजार 847 रुपये होतील. PPF ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. पण दर तीन महिन्यांनी त्याचा व्याजदर निश्चित केला जातो. इथे आम्ही सध्याच्या 7.1 टक्के व्याजदरानुसार गणना केली आहे.

 investment sector
अदानींची 70 हजार कोटींची गुंतवणूक, हजारोंना मिळणार रोजगार

एसआयपीचा महिमा
जर तुम्ही म्युच्युअल फंडात 25 वर्षांसाठी दर महिन्याला SIP मध्ये गुंतवणूक करायची केली तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 80 लाख 27 हजार 342 रुपये होते. इथे 10% वार्षिक परताव्याने कॅलक्युलेट केले जाते. आता जर तुम्ही ती 30 वर्षांसाठी वाढवली तर तुम्हाला 1 कोटी 36 लाख 75 हजार 952 रुपये परतावा मिळेल. पण, तज्ज्ञांच्या मते 10 टक्के परतावा हा अंदाजे आहे, यापेक्षा कितीतरी पटीने अधिक परतावा मिळू शकतो आणि आता विचार करा की दर महिन्याला 6000 ची एसआयरी केल्यास किती पैसे जमा होऊ शकतील.

डायव्हर्सिफाइड फंड्स
डायव्हर्सिफाइड फंडांना 12 टक्के परतावा मिळणे सामान्य आहे. या दरानुसार 25 वर्षांत ही रक्कम 1 कोटी 13 लाख 85 हजार 811 रुपये आणि 30 वर्षांत ही रक्कम वाढून 2 कोटी 11 लाख 79 हजार 483 रुपये होईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com