esakal | कसं आहे ड्रग्ज विश्‍व? त्याविषयी
sakal

बोलून बातमी शोधा

कसं आहे ड्रग्ज विश्‍व? त्याविषयी....

अलीकडेच मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीतील आलिशान बंगल्यात चाललेल्या हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर धाड टाकून पोलिस पथकाने ३१ जणांना अटक केली. या लोकांनी रेव्ह पार्टी करत चरस, गांजा व कोकेनचे सेवन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कसं आहे हे ड्रग्जचे विश्‍व, त्याविषयी..

कसं आहे ड्रग्ज विश्‍व? त्याविषयी....

sakal_logo
By
अनिश पाटील - सकाळ वृत्तसेवा

मुंबई हे पहिल्यापासून व्यापारी शहर. त्यामुळे येथे भामटे, लुटारू, चोर, गुंड यांचा राबता पहिल्यापासूनच. मुंबईची गोदी हे तर त्यांचे केंद्र. फार पूर्वी, म्हणजे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळातही गोदीवर गुंडांच्या टोळ्यांचा धुमाकूळ चालत असे. ‘मुंबईचे वर्णन’ या १८६३ च्या गोविंद नारायण मडगांवकर यांच्या पुस्तकात त्याचे उल्लेख येतात. ते सांगतात, ‘अट्टल तर्कटी लोकांची जूट पुष्कळ वर्षांपासून मुंबईत होती, हीस बंदर ग्यांग असे म्हणत. हींत प्रतिष्ठित खोजे, मेमण, लवाणे, भाट्ये व दुसऱ्या जातीचे लोक होते. हे सर्व मिळून सुमारें तीनशें लोकांची टोळी होती. हींत कित्येक लाखो रुपयांचे धनीं होते...’ हे लोक काय करीत, तर ‘बाहेर गावांतून तंबाखू व दुसरा माल आणून बंदरांत उतरवत. आणि तो जकात भरल्यावाचून शहरांत आणून वखारींत भरून टाकीत. हें कृत्य साधायास त्यांनी कनिष्टेबल, हवालदार व पोलीसचे व कष्टम खात्यांतील कित्येक शिपायांस दरमहा ठरावून आपल्या हाताखाल करून ठेंविले होतें!’

हे तस्कर तेव्हाचे. तंबाखू तस्करीची जागा पुढे चरस, गांजाने घेतली. कोकेनच्या पैशांवर एकेकाळी अधोविश्व पोसले जात होते. रस्ते, पाणी आणि हवाई मार्ग, तस्करांनी काहीच सोडले नाही. दाऊद टोळीने तर इक्बाल मिर्चीच्या मदतीने ड्रग्जच्या व्यापारातून रग्गड माया कमावली व त्याच्या बळावर अधोविश्वावर सत्ता गाजवली. कोकेन, हेरॉईनसारख्या ड्रग्जसोबत पुढे बाजारात सिन्थेटीक ड्रग्स आले आणि रासायनिक कारखान्यांच्या माध्यमातून देशातच केटामाईन, एम्फेटामाईनसारख्या ड्रग्जची निर्मिती देशातच होऊ लागली. सध्या निर्मनुष्य तस्करीवर भर वाढला आहे. त्यातून डार्क नेट, आंतरराष्ट्रीय पोस्ट, कुरिअर सेवा, जहाजांवरील कंटेनरच्या माध्यमातून तस्करीवर भर दिला जात आहे. कोरोना काळात या निर्मनुष्य तस्करीत आणखी वाढ झाली आहे.

हेही वाचा: चाकणमध्ये सैराट! मुलीला पळवून नेल्याच्या रागात दोघांचा खून

कोरोना काळात ड्रग्ज तस्करीच्या मार्गातही बदल झाले आहेत. एरवी अफगाणिस्तानातून येणारे हेरॉईन पाकिस्तानमार्गे बॉर्डरवरून लपवून भारतात आणले जायचे. पण गेल्या दोन महिन्यांत हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, मुंबई व बंगळुरू येथे महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईत आफ्रिका खंडातील देशांमधून हेरॉईन घेऊन आलेल्या दहा जणांना अटक केली आहे. चौकशीत आरोपींकडून जप्त करण्यात आलेले ५३ किलो हेरॉईन अफगाणिस्तानातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पाकिस्तानमार्गे येणारे हेरॉईन आता आफ्रिकी देशांमार्गे भारतात आणले जात असल्याचा आम्हाला संशय असल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय या कोरोनाकाळात भारतातून कॅनडामध्ये होणाऱ्या केटामाईनच्या वितरणातही खिळ बसली आहे.

हेही वाचा: पुणे-नाशिकचा प्रवास होणार सुसाट; नारायणगाव बायपासचं काम पूर्ण

कारवाईमुळे बडे वितरक पळाले

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणानंतर केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईतील ड्रग्ज तस्करांचे अक्षरशः कंबरडे मोडले. त्याच्यापाठोपाठ मुंबई पोलिसांनीही कारवाईत वाढ केली. त्यामुळे मुंबईतील अनेक बड्या ड्रग्ज वितरकांनी शहराबाहेर पलायन केले आहे. कोरोनाकाळात मुंबई पोलिसांनी ६७८ गुन्ह्यांमध्ये ८०९ ड्रग्ज विक्रेत्यांना अटक केली. केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) १०१ गुन्ह्यांमध्ये २४० तस्करांना अटक केली. एनसीबीचे सहसंचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीबीने ड्रग्जच्या वितरणाची पाळेमुळे खणून काढली आहेत.

हेही वाचा: पुणे-नाशिकचा प्रवास होणार सुसाट; नारायणगाव बायपासचं काम पूर्ण

हायटेक तंत्रज्ञानाचा वापर...

मेसेंजिग ॲप्लिकेशन, डार्क नेट व क्रिप्टोकरन्सीच्या (आभासी चलन) मदतीने कुरिअरद्वारे घरपोच ड्रग्ज पोहोचवण्याची मोडस ऑपरेंडी सध्या आंतरराष्ट्रीय तस्कर वापरत आहेत. विशेष म्हणजे या मोडस ऑपरेंडीमध्ये सर्व व्यवहारांसाठी तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुळे तस्करांपर्यंत पोहोचणे शक्‍य होत नाही. बिटकॉईनसारख्या क्रिप्टोकरन्सीवर ड्रग्जचा हा व्यवहार होतो. ड्रग्ज खरेदी-विक्री व्यवहार दिसतो, तितका सोपा नाही. डार्क आणि डिप अशा दोन प्रकारांत हा व्यवहार होतो. इंटरनेटवरील या तस्करांच्या साईटवर मेंबरशिप घ्यावी लागते. बिटकॉईनवर ही मेंबरशिप मिळते. एक बिटकॉईन एक लाखाहून अधिक रुपयांचा असतो. या इंटरनेट साईटवर मेंबर होण्यासाठी काही लाख रुपयांचे बिटकॉईन खरेदी करावे लागतात. मात्र नुसते बिटकॉईन खरेदी करूनदेखील तुम्हाला मेंबर केले जाईल याची कोणतीही खात्री नसते. जो पर्यंत या तस्करांना तुम्ही खरेच अमली पदार्थांची खरेदीसाठी मेंबर बनत आहात याची खात्री पटत नाही, तो पर्यंत तुम्हाला मेंबर करून घेतले जाऊ शकत नाही. डार्कनेटवर असे क्रमांक व लिंक्‍स उपलब्ध आहेत. त्यामार्फत मेसेंजरद्वारे ऑर्डर दिली जाते. त्याची रक्कमही क्रिप्टोकरन्सीमार्फत दिली जाते. या कोणत्याही व्यवहारात विक्रेत्याचा प्रत्यक्ष सहभाग येत नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्‍य नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या वितरणासाठी कुरियर सर्विसचा वापर होत असल्यामुळे ग्राहक व विक्रेता यांच्यात कोणाताही संबंध उरत नाही. परिणामी आरोपींकडे पोहोचणे जवळपास अशक्य झाले आहे.

हेही वाचा: कोरोनानंतर Monkeypox चा धोका; अशी आहेत लक्षणे

असे पोहचवले जातात अमली पदार्थ

हे अमली पदार्थ महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहचवण्यासाठी त्याचे व्हॉट्‌सॲप ग्रुप किंवा फेसबुकवर सांकेतिक भाषा वापरून पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टीत फिल हाय आणि ट्रान्समध्ये नेण्यासाठी कोकेन, केटामाईन आणि टूसीबीसारखे अमली पदार्थ विकले जातात. त्यावर तरुण पिढी लाखो रुपयांची उधळण करते. काही पंचतारांकित हॉटेल्समध्ये अमली पदार्थांचे व्यवहार होतात. त्याचबरोबर मोठमोठ्या ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेन्ट किंवा कुरिअरच्या माध्यमातून तस्कर हे अमली पदार्थ पार्टीत आणतात. कोरोना काळात याला मर्यादा आल्या आहेत.

हेही वाचा: अकरावी प्रवेशाच्या ‘सीईटी’साठी सोमवारपासून अर्ज उपलब्ध

नायजेरियन तस्करांची मक्तेदारी

मुंब्रा, दिवा, मिरा रोड, वसई आणि नवी मुंबईतील काही भागांत मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या नायजेरियन नागरिकांच्या गुन्हेगारीविषयक हालचाली रोखण्याचे नवे आव्हान पोलिसांसमोर आहे. या नायजेरियन नागरिकांनी एमडी, एफेड्रीन अशा अनेक नव्या अमली पदार्थांची तस्करी भारतात सुरू केल्याने या नव्या अमली पदार्थाची पडताळणी करण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत. बेकायदेशीररीत्या भारतात आलेले ९५ टक्के नायजेरियन हे ऑनलाईन फसवणुकीचे आणि अमली पदार्थ तस्करीचे काम करतात. या नायजेरियन टोळींच्या अनेक वस्त्या मुंबईबाहेर वसू लागल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. आता आंतरराष्ट्रीय तस्करही त्यांच्याशी हात मिळवणी करून ड्रग्जचे वितरण करत आहेत.

हेही वाचा: नीरेत मुळशी पॅटर्न, कुख्यात गुंड गणेश रासकरची भर चौकात हत्या

भारतातील ड्रगमाफिया आपल्या पाताळयंत्री कारवायांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील कच्च्या दुव्यांचाही वापर करत आहेत. परदेशातून केमिकल ड्रग्जला असलेल्या मोठ्या मागणीमुळे भारतातील अमली पदार्थांचे तस्करही चरस, गांजा यांसारख्या पारंपरिक पदार्थांकडून केमिकल ड्रग्जच्या निर्यातीकडे वळले आहेत. त्यानंतर हे ड्रग्ज परदेशात पाठवण्यात येते. तस्कर औषधाच्या प्रिस्क्रिप्शनच्या माध्यमातून ‘ओव्हर द काऊंटर’ औषधे खरेदी करून त्यातील प्रतिबंधित रसायने वेगळी करतात. त्यानंतर ही रसायने परदेशात ड्रगनिर्मितीसाठी पाठविली जातात. तस्करांच्या या नव्या मोडस ऑपरेंडीला ‘डॉक्‍टर शॉपिंग’ असे म्हटले जाते. याला आळा घालण्यासाठी सध्यातरी भारतात प्रभावी असा कोणताही उपाय उपलब्ध नसल्याने एकप्रकारे ड्रगमाफियांनी सरकारपुढेच आव्हान निर्माण केले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र, केरळमधील रुग्णवाढ चिंताजनक; मोदींचा इशारा

भारतीय व्यवस्थेतील दोषांचा पुरेपूर फायदा घेऊन तस्कर हा केमिकल ड्रग्जचा व्यापार करीत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बाजारातील अनेक औषधांपासून ड्रग्ज तयार करण्यासाठीची केमिकल वेगळी करता येतात. त्यामुळे परदेशात आणि भारतातही ही औषधे प्रतिबंधित करण्यात आली आहेत. फक्त डॉक्‍टरांच्या निर्देशानुसार ती ग्राहकाला देता येतात; पण भारतीय बाजारातील त्रुटी हेरून तस्कर एकाच चिठ्ठीद्वारे शहरातील अनेक दुकानांतून ही औषधे खरेदी करतात. कधीकधी औषधविक्रेते डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवायच अशी प्रतिबंधित औषधे विकतात. त्यानंतर हा औषधसाठा रासायनिक कारखान्यांत एकत्र करून त्यातील एफेड्रीन व कॅटामाईन ही प्रतिबंधित रसायने वेगळी केली जातात.

हेही वाचा: बदला घेण्यासाठी Ex बॉयफ्रेंडची गाडी घेतली अन् 49 वेळा....

यंत्रणेला चकवा

केमिकल ड्रग्ज वेगळे करण्याचे काम कोणत्या कारखान्यात सुरू आहे, याचा शोध लावणे तसे अवघड आहे. या औषधांच्या खपात अनपेक्षितपणे वाढ झाल्यास त्या ठिकाणी छापा टाकून तस्करांचा छडा लावला जात असे; पण डॉक्‍टर शॉपिंग या नव्या कार्यप्रणालीचा वापर करून तस्कर एकाच विभागातील दुकानांतून प्रतिबंधित औषधे न घेता शहरातील विविध दुकांनातून खरेदी करीत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे अमली पदार्थविरोधी विभागाला कठीण जात आहे.

तंत्रज्ञानाचा वापर

परदेशात डॉक्‍टर शॉपिंगला आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. डॉक्‍टरांचा संगणक व औषधांच्या दुकानांमधील संगणक एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे डॉक्‍टरांनी एखाद्या रुग्णाला हे औषध लिहिल्यास त्याची पूर्ण माहिती या यंत्रणेद्वारे औषध विक्रेत्यांना कळते. त्यामुळे ‘ओव्हर द काऊंटर’ औषधांची खरेदी करणे तस्करांना कठीण जाते; पण आपल्याकडे अद्याप ही यंत्रणा अस्तित्वात आली नाही, अशी माहिती एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिली. परदेशात होणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे तेथे ही प्रतिबंधित केमिकल मिळविणे कठीण जात आहेत. परिणामी, आंतरराष्ट्रीय तस्कर यासाठी मोठी रक्कम देण्यास तयार असतात. याचाच फायदा घेऊन भारतीय तस्कर मोठ्या प्रमाणात ही केमिकल निर्यात करून कमाई करीत आहेत.

हेही वाचा: Covishield लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच...

अमली पदार्थांना सांकेतिक नावे

भाई, एक शिवा, और दो बुद्धा देना असे कोणी बोलत असेल, तर ते देवांबद्दल नसून ते ड्रग्ज विक्री करत आहेत, असे समजा. कारण आता ड्रग्ज विक्रेत्यांनी ड्रग्जना चक्क देवता आणि धर्मगुरूंची नावे दिली असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

एलएसडी एसिड पेपर पार्टी ड्रग्ज म्हणून ओळखला जातो, त्याच्यात तीन प्रकार आहेत, हाय इंटेसिटीव्ही, नॉर्मल आणि लो इंटेसिटीव्ही.

१) कमी क्षमतेचा थेंब प्रत्येकी ३ ते ४ हजार रुपये, त्याला सांकेतिक भाषेत लॉर्ड शिवा म्हणतात. या पेपरवर शिवाचे चित्र असते. खुल्या बाजारात त्याची किंमत पाच हजार रुपये आहे.

२) मध्यम क्षमतेचा थेंब प्रत्येकी सहा ते सात हजार, सांकेतिक भाषेत त्याला लॉर्ड गौतम बुद्ध म्हणतात. खुल्या मार्केटमध्ये त्याची किंमत आठ हजार आहे.

३) सर्वात उच्च क्षमतेच्या थेंब प्रत्येकी १० हजार, खुल्या बाजारात त्याची किंमत १२ हजार, त्याला सांकेतिक भाषेत दलाई लामा म्हणतात. तो एकदम ओरिजनल असल्यामुळे त्याला दलाई लामा असे म्हटले जाते. ओपन मार्केटमध्ये त्याला सर्वाधिक मागणी आहे. एलएसडी पेपर हा पार्टीमध्ये अधिक प्रमाणात वापरला जातो. एलएसडीचा लहानसा तुकडा जिभेखाली ठेवला जातो. त्यामुळे नशा करणारे मेडिटेशनमध्ये जातात. या ड्रग्जचे तरुणांमध्ये जास्त प्रमाण आहे. पब, डिस्कोथेबमध्ये याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेष म्हणजे एलएसडीचा रक्तातील अंश केवळ दोन तासांपुरता मर्यादित राहतो. त्यामुळे तत्काळ किक बसते व लवकर उतरते. तसेच एखाद्या वेळेस या ड्रग्जचे सेवन केलेल्या व्यक्तीच्या रक्ताची दोन तासांनंतर तपासणी केली, तर त्याचा अहवाल निगेटिव्ह येतो. त्यामुळे कायदेशीर कचाट्यात न अडकण्यासाठी धनाढ्य या ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. रेव्ह पार्ट्यामध्ये विशेष करून याच ड्रग्जचा वापर होतो.

रॉन(एमडी) पूर्वी म्याव म्याव, चाची या नावाने ओळखला जायचा. मात्र या एमडीला ड्रगमाफिया यांनी नवीन ओळख करून दिली. त्याला सध्या कपडा, बुक असे सांकेतिक भाषेत संबोधित केले जाते. एमडी मागणारे १ बुक, एक कपडा (एका वेळचे) अशी मागणी करीत आहेत.

कोकेन हा अमली पदार्थ सर्वात महागडा असून, ड्रगमाफिया जेव्हा जेव्हा वेळ पडेल तेव्हा त्याचे कोड बदलतात. कोकेनमध्ये बनावट कोकेनसुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. या बनावट कोकेनला चायना व्हाईट असे कोड आहे. चायना बनावट वस्तूसाठी फेमस असल्यामुळे हे नाव देण्यात आले आहे. कोकेनला मुख्यतः ओजी व्हाईट म्हणतात, तसेच व्हाईट आईस, अशी अनेक नावे आहेत. स्थानिक पातळ्यांवरही या सांकेतिक नावांमध्ये बदल होतो. पूर्वी या ड्रग्जसाठी चित्रपट अभिनेत्रींच्या नावाचा वापरही केला जायचा.

गांजाला घास, मेथी हे कोड आहे. तसेच चरसमध्ये दोन दर्जाचे चरस उपलब्ध आहेत. काश्‍मिरी आणि देहराडुनी असे दोन प्रकारचे चरस उपलब्ध आहेत. काश्‍मिरी चरस हा उच्चप्रतीचा असून मार्केटमध्ये त्याची जास्त मागणी आहे. त्याच्यातही दोन प्रती आहेत. एकाला काला पत्थर आणि दुसऱ्याला काला साबण म्हणतात. डेहराडुनी चरसला रबडी असा कोड आहे.

हेही वाचा: HIV+ महिलेच्या शरिरात 216 दिवस कोरोना; 32 वेळा झाला म्युटेट

असा होतो शिकार

बारबाला

अमली पदार्थांच्या विक्रीसाठी विक्रेते ड्रग्जचे खोटे फायदे सांगतात, त्याला बळी पडून अनेक जण या व्यसनाला बळी पडतात. मेफेड्रॉनमुळे (एमडी) झिरो फिगर मिळते व ऊर्जा मिळते, असा अपप्रचार आहे. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी व तासनतास नाचण्यासाठी बारबाला सध्या मोठ्या प्रमाणात एमडीचा वापर करत आहेत. रजनीगंधामध्ये मिसळून बारबाला एमडीचे सेवन करत आहेत. सध्या मुंबईतील ५० टक्‍क्‍यांहून अधिक बारबाला या व्यसनाच्या आहारी गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

तरुण, विद्यार्थी

रात्री उशिरापर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता, एमडीमुळे त्वचा सतेज राहते, या भूलथापांना महाविद्यालयीन तरुण-तरुणी बळी पडतात. त्यातील सुंदर मुलींना हेरून विक्रेते त्यांना मोफत एमडी पुरवतात. चौथ्या-पाचव्यांदा याचे व्यसन लागले की त्यांना या ड्रग्जच्या विक्रीत गुंतवतात. अशा विद्यार्थांच्या मदतीने ते इतर विद्यार्थ्यांना या नशेच्या जाळ्यात ओढतात. पश्‍चिम उपनगरातील अशीच उच्चभ्रू घरातील मुलगी या तस्करांच्या नादी लागली होती. त्यातून तिने घरातून पलायनही केले होते; पण केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने तिचे समुपदेशन केले. शाळेतील मुलांना हेरण्यासाठी कॅंडी व चॉकलेटमध्येही अमली पदार्थ भरून त्याला हे व्यसन लावण्यात येते.

ड्रग्ज हे स्लो पॉईझन आहे. सुरुवातीला शरीरात एखादी ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटते, पण त्यानंतर मानसिक आजार, निद्रानाश, मेंदूला इजा असे आजार जडतात. त्यानंतर अगदी तडफडून एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होतो. ड्रग्सचे अधिक सेवन करणाऱ्याला अचानक सेवन बंद झाले की, सुरुवातीला त्याचे हातपाय थरथरणं, डोकं दुखणं, संभ्रम, जीव कासावीस होणे आदी त्रास व्हायला सुरुवात होते. काहींना फिट्‌सही येतात, तर काहींचा मृत्यूही होतो. एमडी या अमली पदार्थाचे नियमित सेवन करणाऱ्या व्यक्तीचा तर दोन ते तीन वर्षांत मृत्यू होतो. तरुण पिढी सर्वाधिक एमडीचे सेवन करत आहे.

हेही वाचा: नियम बदला पण यानांच भारतरत्न द्या!, PM मोदींकडे मागणी

कसा ओळखायचा ड्रग्जचा विळखा?

1 ड्रग्जच्या विळख्यात अडकलेली मुले अधिक निष्काळजी बनतात. ते त्यांच्या दिसण्याकडे लक्ष देत नाहीत. कपड्यांवरही लक्ष देत नाहीत. अनेक वेळा दाढी करत नाहीत, आंघोळही करणे टाळतात.

2 हे लोक एकांतात राहणे पसंत करतात. कुटुंबीय इतर नातेवाईकांपासून दूर राहतात. जुने मित्र सोडून त्यांच्यासारख्याच ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या मुलांसोबत

मैत्री करतात.

3 त्यांच्या हालचालींमध्ये शिथिलता येते. खेळात उत्तम असलेली मुलेही खेळांपासून दूर राहतात. त्यांचा स्टॅमिना कमी होतो.

4 तत्काळ राग येतो. पालकांच्या अंगावर ओरडणे असे बदलही मुलांमध्ये पाहायला मिळतात.

loading image