Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News Updates 17 sept 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal
Updated on: 

Washim-Karanja Road : वाशिम-कारंजा मार्गावर CNG गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट; जीवितहानी टळली

वाशिम : वाशिम-कारंजा मार्गावर CNG गॅस वाहून नेणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना गुरुवारी (ता. १७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. हा ट्रक कारंजा येथून वाशिमच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर परिसरात प्रचंड मोठा आवाज झाला. आवाज ऐकून गावकऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यांनी ट्रकच्या चालकाला सुरक्षित स्थळी हलवले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, स्फोटामुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

Loading content, please wait...