Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीला बदलणार 'या' सहा राशींचे भाग्य | Astrology | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

astrology

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीला बदलणार 'या' सहा राशींचे भाग्य, तुमची रास यात आहे का?

हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. त्यातच अश्र्विन महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही वर्षभरातील एक विशेष चतुर्थी मानली जाते. या चतुर्थीचा अनेकांवर सकारात्म परिणाम पडतो. यावर्षी सुद्धा या संकष्टी चतुर्थीचा सहा राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. ज्यामुळे या सहा राशींचे भाग्य बदलणार. त्या सहा राशी कोणत्या, चला जाणून घेऊया. (Sankashti Chaturthi )

हेही वाचा: Astrology: H अक्षरापासून नाव असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

वृषभ -

वृषभ राशींच्या लोकांना उत्सव आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा योग असेल. त्यामुळे अत्यंत प्रभावशाली लोकांशी यांचा संपर्क येईल आणि यांचे आयुष्य बदलणार. या राशीच्या लोकांना स्वत:साठी वेळ मिळणार त्यामुळे ते आत्मचिंतन करणार. याशिवाय आज तुमच्या कलात्मक गुणांचे कौतुक केले जाणार. यामुळे तुम्हाला अचानक लाभही मिळू शकतो.

कर्क

आज तुम्ही नवीन मित्र बनवाल ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक आज तुम्ही बदल होतील. तुमच्या कुटूंबात समृद्धी येईल. तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दुर होतील आणि घरात सुख शांती लाभेल.

हेही वाचा: Astrology Horoscope : पाळीव प्राण्यांचा कुंडलीतील ग्रहांवर होतो मोठा परिणाम; हा प्राणी विशेष महत्वाचा

सिंह

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. नोकरी- व्यवसायात फायदा होणार. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला भरभरुन आनंद मिळेल. जोडीदाराच्या मदतीने संकटाना तोंड द्याल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ

तुळ राशीचे हाती घेतलेले काम पुर्ण होणार. गुंतवणूकीत यश मिळेल. नोकरी व्यवसायात प्रतिष्ठा मिळेल. कोणतीही समस्या उद्भवल्यास तुम्ही सहजपणे सोडवाल. प्रवासाचे योग येतील. अनपेक्षित गोष्टींपासून लाभ मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Astrology: तुमच्या राशीनुसार 'या' वयात मिळेल तुम्हाला खरं प्रेम

धनु

आजचा दिवस मजेत आणि आनंदाने भरलेला असेल. पैशाची बचत कराल. जुन्या लोकांना भेटण्याचा आज योग आहे. कामात मंद गतीने थोडासा मानसिक ताण येऊ शकतो. कौटूंबिक सुख लाभेल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते. आर्थिक अडचणी दूर होतील.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आज वाढणार आहे. आज तुम्हाला मनाप्रमाणे विश्रांतीसाठी वेळ मिळणार. प्रवासाचा योग येतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हातातील कामे मार्गी लागतील.