Bakari Eid 2023 : आज देशभरात साजरी होतेय बकरी ईद, या दिवशी कुर्बानी का दिली जाते?

bakra eid qurbani: बकरी ईदला पशूबळी देण्याचं इस्लाममध्ये विशेष महत्व आहे.
Bakara Eid 2023
Bakara Eid 2023 esakal

Eid al-Adha 2023 : देशभरात आज म्हणजे गुरुवार २९ जूनला ईद-उल-अजहा चा सण साजरा होत आहे. याला बकरी ईदपण म्हणतात. या दिवशी ईदची नमाज झाल्यावर बकऱ्याचा किंवा अन्य पशुचा बळी दिला जातो.

या बळी देण्याचा म्हणजे कुर्बानीचं या दिवशी विशेष महत्व आहे. कुर्बानी दिल्यावर जे मांस निघतं ते तीन भागांमध्ये वाटलं जातं. यातला एक वाटा स्वतःसाठी, एक नातेवाईकांसाठी आणि एक गरिबांसाठी असतो.

कशी सुरू झाली कुरबानीची प्रथा? (bakra eid qurbani)

इस्लामिक मान्यतांनुसार इस्लामचे पैगंबर हजरत इब्राहिम वयाच्या ८० व्या वर्षी वडिल झाले. त्यांच्या मुलाचे नाव इस्माइल होते. त्याच्यावर वडिलांचं आतोनात प्रेम होतं.

एकदा हजरत इब्राहिम यांना स्वप्न पडलं की, त्यांना आपली सर्वात प्रिय गोष्ट कुर्बान करावी लागेल. इस्लामिक जाणकार सांगतात की, त्यांच्यासाठी हा अल्लाहचा हुकूम होता. त्यामुळे त्यांनी मुलाची कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला.

इस्लामिक मान्यतांनुसार अल्लाहच्या आज्ञेचे पालन करण्यापूर्वी म्हणजेच इस्लाइनची कुर्बानी देण्याआधी हजरत इब्राहिम यांनी मन घट्ट केलं.

डोळ्यांवर पट्टी बांधली आणि मुलाच्या मानेवर सुरा ठेवला. पण जशी त्यांनी सुरी चालवली तिथे मुलाच्या जागी एक बकरा आला. जेव्हा त्यांनी डोळ्यांवरची पट्टी काढली तेव्हा त्यांचा मुलगा सुरक्षित असल्याचं त्यांना दिसलं.

Bakara Eid 2023
Bakari eid 2023 : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर छावणी बाजारात लाखोंची उलाढाल

इस्लामिक मान्यता आहे की ही अल्लाहची फक्त परीक्षा होती. अल्लाह च्या एका आज्ञेवर बजरत इब्राहिम मुलाची कुर्बानी द्यायला तयार झाले होते. अशा प्रकारे पशुबळी देण्याची ही पद्धत सुरू झाली.

बकरी ईदची तारीख धुल हिज्जा महिन्यात चंद्र दिसण्यावर अवलंबून असते. इस्लामिक कॅलेंडरनुसार, धुल हिज्जा हा इस्लामचा 12 वा महिना असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com