Shaligram Shila: शालिग्राम घरात ठेवल्याने होऊ शकतात हे वाईट परिणाम.. एकदा वाचाच..

शालिग्रामची पूजा करताना काही नियमांचे पालन करावे लागते...
Shaligram Shila Tips
Shaligram Shila Tipsesakal
Updated on

Vastu Tips: हिंदू धर्मात शालिग्राम दगडाला विशेष महत्त्व आहे. शालिग्राम हे भगवान विष्णूचं स्वरूप मानलं जातं. शैव संस्कृतीत असे मानले जाते की जेथे भगवान शिव गेले तेथे त्यांच्या पायाखाली आलेल्या खडकांनी शालिग्रामचे रूप धारण करतात. म्हणूनच शैव लोक शालिग्रामला जागृती महादेव म्हणतात.

Shaligram Shila Tips
Astro Tips: ज्योतिष शास्रानुसार या गोष्टी केल्यास तुमच्यावर सदैव लक्ष्मी प्रसन्न राहिलं...

शालिग्रामचे जवळजवळ ३३ प्रकार आहेत, त्यापैकी २४ प्रकारचे शालिग्राम भगवान विष्णूच्या २४ अवतारांशी संबंधित असल्याचे मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात शालिग्राम असतो, त्या कुटुंबावर कधीच दुःख येत नाही. पण शालिग्रामशी संबंधित काही नियमांचे पालन केले नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Shaligram Shila Tips
Astro Tips : लांब पायाच्या महिला देतात धोका? सामुद्रिकशास्त्र सांगतं

गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार, सर्व शालिग्राम शिलामध्ये वास्तु दोष दूर करण्याची खूप चांगली शक्ती आहे. जरी काही वास्तुदोष दूर करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जातात. 

Shaligram Shila Tips
Vastu Tips : तुमच्या घरी 'या' पाच वस्तू असेल तरच हातात पैसा टिकेल

मत्स्य शालिग्राम, नारायण शालिग्राम, गोपाल शालिग्राम, सुदर्शन शालिग्राम, सूर्य शालिग्राम आणि वामन शालिग्राम शिला आहेत. मोठ्या आकाराच्या जनार्दन शालिग्राम, नरसिंह शालिग्राम, वराह शालिग्राम आणि सुदर्शन शालिग्राम शिला हे विशिष्ट जागेची नकारात्मकता दूर करण्यासाठी सर्वात शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते. 

Shaligram Shila Tips
Vastu shastra: घरात सदैव सुख शांती नांदण्यासाठी घराच्या देव्हाऱ्यामध्ये  'या' वस्तू ठेवा

शालिग्राम कुठे मिळतो?

नेपाळच्या गंडकी नदीत शालिग्राम दगड सापडतात. या दगडात एक चक्र आहे, त्याला शालिग्राम म्हणतात. ते चक्र एका किड्याने तयार केले आहे. जो त्याच नदीत सापडतो.

Shaligram Shila Tips
Vastu Tips : पोळपाट-लाटणं आणू शकतं, तुमच्या घरात सुख शांती समृद्धी

शालिग्राम शिला घरात ठेवण्याचे फायदे

शालिग्रामची पूजा केल्याने अध्यात्म प्राप्त होते. सुख-समृद्धीच्या इच्छेसाठी जर लोकांनी शालिग्रामची पूजा केली तर त्यांना नक्कीच यश मिळते. शालिग्राम पूजेने आर्थिक लाभ होतो. सांसारिक सुखही मिळतं. 

Shaligram Shila Tips
Vastu Plant for Money: घरात 'हे' रोप लावा अन् चुंबकासारखा पैसा ओढा

शालिग्राम घरात ठेवल्याने अनेक चमत्कारी फायदे होतात. ज्या घरात शालिग्रामची पूजा केली जाते, त्या घरात लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. शालिग्रामची पूजा करताना काही नियमांचे पालन करावे लागते.

Shaligram Shila Tips
Vastu Tips : घरात सतत निगेटिव्हिटी जाणवते, हे उपाय एकदा कराच...

१. आचरण शुद्ध ठेवा

शालिग्राम हे वैष्णवांचे सर्वात मोठे रूप आहे. शालिग्राम हे धार्मिकतेचे प्रतीक आहे. त्याच्या उपासनेमध्ये आचार आणि विचारांच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले जाते. जर तुम्ही मांस किंवा अल्कोहोलचे सेवन केले तर ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

२. रोजची पूजा

काही वेळा सोडल्या रोज शालिग्रामची पूजा करावी असं सांगितलं जातं. अशा वेळा म्हणजे आजारपण, प्रवास आणि आदी.. 

Shaligram Shila Tips
Vastu Tips : फक्त ऑफिसमधेच नाही तर घरीसुद्धा पाळा हे वास्तु नियम, लॅपटॉप अन् कंप्युटर ठेवा या दिशेत

३. घरात एकच शालिग्राम असावा

घरात एकच शालिग्राम ठेवावा. अनेक घरांमध्ये अनेक शालिग्राम असतात जे योग्य नाही.

४. पंचमृताने अभिषेक करा   

शालिग्रामला रोज पूजेपूर्वी पंचामृताने अभिषेक करावा.

Shaligram Shila Tips
Astro Tips : तोतरे बोलतात? बोलण्याची शैली ठरवते तुमचं व्यक्तिमत्व

५. चंदन आणि तुळस 

शालिग्रामवर चंदन लावल्यानंतर त्यावर तुळशीचे पान ठेवावे. चंदनाची काठी उगळून शालिग्रामला चंदन लावावे हे चंदन खरं असावं.

Shaligram Shila Tips
New Year Astro Tips : एका वर्षात पडणार पैशाचा पाऊस! नवीन वर्षात करा हे उपाय

शालिग्राम ठेवण्याचे दुष्परिणाम 

अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की शालिग्राम दगड हा वैश्विक ऊर्जेचा स्रोत आहे म्हणजे ते स्वतःच एक विश्व आहे. त्यात अफाट शक्ती आहे. त्याचा प्रभाव घरात सर्वत्र राहतो. शक्तीचा हा स्त्रोत शुद्ध आणि सकारात्मक ठेवणे गरजेचं आहे, पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे ते दूषित केले तर नक्कीच तुमच्या घरात संकटे, वाईट घटना किंवा अपघात होऊ शकतात. 

Shaligram Shila Tips
Vastu Tips : 'हे' वास्तू नियम पाळत नाही म्हणून नवरा बायकोमध्ये होतं वारंवार भांडण

जर तुम्ही स्वतःला मांस, दारू, शिवीगाळ, स्त्रियांचा अपमान इत्यादी वाईट गोष्टींपासून दूर ठेवले नाही एकंदरीत शालिग्रामच्या नियमांचे पालन केले नाही तर तुम्ही तुमच्या घरात शालिग्रामची स्थापना करू नये.

Shaligram Shila Tips
Astro Tips : गुरुवारी या गोष्टी केल्याने व्हाल कंगाल, वेळीच व्हा सावध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com