Video: अंगात महिषासूर आल्याचा दावा; गवत-चारा घेऊन भाविकांची दर्शनासाठी गर्दी

या व्हिडिओत एक व्यक्ती गाई-म्हशीप्रमाणे लाकडाचा भुस्सा आणि चारा खाताना दिसतोय.
viral video
viral videosakal

सध्या सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही अचंबित करणारे असतात तर काही अंगावर काटा आणणारे असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओवर एक व्यक्ती गाई-म्हशीप्रमाणे लाकडाचा भुस्सा आणि चारा खाताना दिसतोय. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. (a man claiming to have entered the soul of Bhaisasur in body and eating straw video goes viral)

viral video
Viral Video: दोस्ती लई भारी ! चक्क माकड करतंय माणसाचं सांत्वन


या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क चारा आणि लाकडाचा भूसा खाताना दिसतोय. असं म्हणताहेत हा व्हिडीओ नागपंचमीचा असून या व्यक्तीच्या अंगात महिषासुर आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. बुधिचारा खाताना दिसत आहेत. तेथे आलेले लोकही त्याला भूसा गवत चारा आणि केळी खाऊ घालताना दिसत आहेत.

viral video
Viral Video: भावाला सलाम! जीव धोक्यात घालून वाचवले कुत्र्याचे प्राण

चारा खाणाऱ्या या व्यक्तीचं नाव बुधिराम असून मागील ४०-४५ वर्षांपासून नागपंचमीला त्याच्या अंगात महिषासुर येत असल्याची मान्यता स्थानिकांची आहे. दर नागपंचमीला बुधिराम हा जनावरांप्रमाणे भूसा चारा खातो आणि विशेष म्हणजे त्याला भूसा चारा चारण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com