Video: तरुणाचा भन्नाट जुगाड, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ

अलीकडेच आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर एक जुगाडचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे.
Video: तरुणाचा भन्नाट जुगाड, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ

आनंद महिंद्रा यांनी एका जुगाडचा व्हिडीओ शेअर केला असून, या व्हिडिओत झाडांचे फळे तोडण्यासाठी एका भन्नाट जुगाड एका तरुणाने तयार केला आहे. व्हिडिओमध्ये या तरुणाने कोल्ड ड्रिंकची बाटली वापरुन टाकाऊ पासुन उपयोगी गोष्ट तयार केली आहे. आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अलीकडेच त्यांनी आपल्या सोशल मीडियावर हा जुगाडचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हा तरुण प्लास्टिकच्या बाटलीच्या साहाय्याने सहज रित्या फळे तोडतांना दिसतोय.

Video: तरुणाचा भन्नाट जुगाड, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ
JNU मध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, सडल्याने ओळखही पटेना
Video: तरुणाचा भन्नाट जुगाड, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ
मास्क वापरण्याचं आवाहन, सक्ती नाही; राजेश टोपेंचं स्पष्टीकरण

नेमक काय जुगाड केलाय?

हा भन्नाट जुगाड तयार करणारा एक तरुण आहे. या तरुणाने पाईप, दोरी आणि प्लास्टीक बाटलीच्या सहाय्याने हे फळ तोडायचे यंत्र तयार केले आहे.अन तो या यंत्राच्या मदतीने सहजरित्या फळे तोडत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल @anandmahindra वरून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत 4 लाख 68 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर या व्हिडिओवर अनेकांच्या भन्नाट.कमेंट्सही आल्या आहेत.

Video: तरुणाचा भन्नाट जुगाड, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ
अफवांना बळी पडू नका, भारतात अद्याप मंकीपॉक्सचा रुग्ण नाही - Govt

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला लोकांना खूप पसंती मिळत आहे.

एका यूजरने यावर कमेंट करताना लिहिले आहे."खरंच आम्ही भारतीय खूप जुगाडी आहोत" तर एका यूजरने लिहिले आहे की "काय कल्पना आहे सर, आता तुम्हाला दगडफेकीपासून सुटका मिळेल." अशा वेगवेगळ्या कमेंटचा या व्हिडिओवर पाऊस पडतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com