Bhalchandra Nemade: नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे खरंच औरंगजेबाने सती प्रथा बंद केली होती का?

मुघलांच्या इतिहासामध्ये औरंगजेबाच्या काळातल्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या गोष्टींचे भारतावर दूरगामी परिणाम झालेले आढळतात.
Bhalchandra Nemade Aurangjeb
Bhalchandra Nemade AurangjebSakal

मुघलांच्या इतिहासामध्ये औरंगजेबाच्या काळातल्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या गोष्टींचे भारतावर दूरगामी परिणाम झालेले आढळतात. आजही त्या गोष्टींवर चर्चाही होत असते. आज आपण औरंगजेबाच्या काळातल्या अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याविषयी फारशी माहिती ऐकिवात नाही.

हा विषय चर्चेत येण्याचं कारण म्हणजे प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांनी नुकतंच केलेलं एक विधान. औरंगजेबाने सतिप्रथा बंद केली, अशा आशयाचं विधान केल्याने भालचंद्र नेमाडे सध्या टीकेचे धनी होत आहेत. हे सगळं प्रकरण काय आहे? औरंगजेबाचा इतिहास याबद्दल काय सांगतो, या सगळ्याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत.

औरंगजेबाचं भाषाज्ञान, त्याचं एका मुलीला बघून बेशुद्ध पडणं, युद्धभूमीवरचे किस्से, अशा अनेक गोष्टींची चर्चा सतत होत असते. आता त्याने सती प्रथेसंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल दिलेला आदेश चर्चेत आहे.

Bhalchandra Nemade Aurangjeb
Bhalchandra Nemade: 'इंग्रजांनी महाराष्ट्राला पेशव्यांच्या तावडीतून सोडवलं'; भालचंद्र नेमाडे यांचं वक्तव्य

मुघल काळ आणि सती प्रथा

मुघलांच्या शासन काळामध्ये सर्वात आधी हुमायूनने या प्रथेवर बंदी घालण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख झी न्यूजने आपल्या बातमीत केला आहे. पण या मोहिमेमध्ये त्याला यश मिळू शकलं नाही. त्यानंतर अकबरने सती प्रथेवर बंदी घालण्याचे आदेश दिले. पण त्या काळी काही महिला स्वेच्छेने सती जात होत्या, त्यामुळे ही प्रथा बंद झाली नाही, असंही झी न्यूजने म्हटलं आहे.

पुढे औरंगजेबापासून इंग्रजांच्या काळापर्यंत ही प्रथा तशीच चालू राहिली. पण १८ व्या शतकाच्या शेवटी ही प्रथा देशाच्या काही भागांमध्ये बंद करण्यात आली. विशेषतः युरोपीयांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात या प्रथेचं प्रमाण कमी झालं.

विदेशी लेखकांचं याबद्दल काय मत आहे?

झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, औरंगजेबाच्या जीवनावर अनेक इतिहासकारांनी लिहिलेलं आहे. इटलीचा खलाशी निकोला मनुची हा ईराणमार्गे भारतात आला होता. त्याने काही काळ मुघल दरबारात कामही केलं होतं. त्याने आपल्या एका पुस्तकात लिहिलं आहे की, मी अर्मेनियाच्या एका सहकाऱ्यासोबत फिरत होतो. तेव्हा एके ठिकाणी एक हिंदू महिला जळणाऱ्या चितेभोवती फेऱ्या मारत होती. अचानक तिची नजर माझ्यावर पडली. मला असं वाटलं की ती म्हणतेय मला वाचवा. तेव्हा माझ्या सहाकऱ्याने मला विचारलं की तिला वाचवण्यात मदत करणार का?

मी हो म्हटलं आणि तलवार काढली. त्यानंतर आमचे सैनिकही आमच्यासोबत आले. आम्ही आमचे घोडे घेऊन वेगाने तिथे पोहोचले. तिथले पुरुष पळून गेले, पण महिला एकटीच राहिली. तिला माझ्या सहकाऱ्याने घोड्यावर बसवलं आणि आम्ही तिकडून निघून आलो.

Bhalchandra Nemade Aurangjeb
Bhalchandra Nemade | हरामखोर लोकांना निवडून देतो, ही त्याचीच फळे : साहित्यिक भालचंद्र नेमाडे

मनुची पुढे म्हणतो की, त्या सैनिकाने त्या महिलेशी लग्न केलं आणि तिला घेऊन पश्चिमेकडे रवाना झाला. अनेक महिन्यांनंतर जेव्हा मी सूरतला गेलो, तेव्हा मला माझा तो सहकारी आणि ती महिला आपल्या मुलासोबत दिसले. त्या महिलेने जीव वाचवल्याबद्दल माझे आभार मानले. पण जेव्हा औरंगजेब काश्मीरवरुन परतला, तेव्हा काही ब्राह्मण त्याच्याकडे तक्रार घेऊन गेले. त्यांनी सांगितलं की मुघल सैनिक त्यांच्या प्रथेमध्ये अडथळा निर्माण करून महिलेला सती जाऊ देत नाहीये. त्यानंतर औरंगजेबाने तात्काळ एक सरकारी फर्मान काढलं की, जिथपर्यंत मुघलांचं राज्य आहे, त्या संपूर्ण भागामध्ये एकही महिला सती जाणार नाही.

सती प्रथा म्हणजे काय?

सती प्रथा ही भारताच्या इतिहासातली एक दुर्दैवी प्रथा मानली जाते. यामध्ये पतीचं निधन झाल्यावर त्याच्या चितेबरोबरच त्याच्या पत्नीलाही जिवंत जाळलं जात असेल. अनेकदा या प्रथेसाठी महिला तयार होत असतं.तर बऱ्याचदा त्यांना सती जाण्यासाठी बळजबरी केली जात असे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com