केमो सुरु असताना कॅन्सर रुग्णाची नोकरीसाठी मुलाखत; पोस्ट व्हायरल

कॅन्सरने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीने केमोथेरपीच्या प्रक्रियेदरम्यान हॉस्पिटलच्या बेडवर बसून जॉब इंटरव्ह्यू दिलाय
viral post
viral postsakal

तुम्ही जर दवाखान्यात अॅडमिट आहात आणि तुमचा जॉब इंटरव्ह्यू असेल तर तुमचे उत्तक नक्कीच नाही असणार. पण सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून तुम्हाला थक्क करणारी आहे. कॅन्सरने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीने केमोथेरपीच्या प्रक्रियेदरम्यान हॉस्पिटलच्या बेडवर बसून जॉब इंटरव्ह्यू दिलाय. आणि आश्चर्यकारक म्हणजे या व्यक्ती जॉब इन्टरव्ह्युमध्ये सिलेक्ट झालाय. अर्श नंदन प्रसाद असे या व्यक्तीचे नाव असून हा मूळचा जमशेदपूर, झारखंडचा आहे

viral post
पतीने पत्नीला सोडले प्रियकराच्या गावी; वडील भांडताहेत हुंड्यासाठी

अर्श नंदन प्रसाद याने लिंक्डइनची त्याच्या एका फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘त्याला सहानुभूतीची गरज नाही, तर त्याला स्वत:ला सिद्ध करायचे आहे.’

viral post
'पेट्रोल-डिझेलवरील करांमधून पंतप्रधान मोदींनी २६ लाख कोटी कमवले'

अर्शच्या या जिद्दीचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक केले जात आहे. नेटकरी त्याच्या फायटिंग स्पिरिटला सलाम करत आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com